Bhoot Bangla Release Date: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा कायम त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याचा प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक असतात. लवकरच खिलाडी कुमार भूत बंगला या त्याच्या आगामी चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून येत्या काही दिवसांत अक्षयचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाबाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाचे प्रदर्शन आणखी लांबणीवर गेलं असल्याचं बोललं जातंय.
न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला ‘भूत बंगला’ हा सिनेमा १० एप्रिल रोजी रिलीज केला जाणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र, आता मेकर्स चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा चित्रपट १० एप्रिल ऐवजी १७ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार असल्याचं कळतंय.
काय आहे कारण?
अक्षय कुमार ने ९ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या वाढदिवसांचं औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासून चाहते या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र,आता जवळजवळ तिसऱ्यांदा या सिनेमाची तारीख बदलली गेल्याचं कळतंय. सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगचा 'धुरंधर-२' धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने फक्त ९ दिवसांत ११०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. अद्यापही 'धुरंधर-२' ची क्रेझ काही कमी झालेली नाही.'व्हायरायटी इंडिया'च्या एका वृत्तानुसार, 'धुरंधर २' मुळे चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणजे १७ एप्रिलला भूत बंगलाची रिलीज डेट बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशी चर्चा सिनेवर्तुळात सध्या रंगू लागली आहे. यावर निर्माते आणि अक्षयमध्ये चर्चा देखील सुरु असल्याची अपडेट कळते आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, ‘भूत बंगला’ या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर आहेत.
Web Summary : Akshay Kumar's 'Bhoot Bangla' release may be postponed. Initial date was April 10th, now possibly April 17th. 'Dhurandhar-2' success could be the reason for the shift.
Web Summary : अक्षय कुमार की 'भूत बंगला' की रिलीज स्थगित हो सकती है। शुरुआती तारीख 10 अप्रैल थी, अब संभवतः 17 अप्रैल। 'धुरंधर-2' की सफलता बदलाव का कारण हो सकती है।