दमदार अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारवर (Akshay Kumar ) गेल्या काही दिवसांपासून चाहते काहीसे नाराज आहे. कारण आहे, पान मसाल्याची जाहिरात. होय, पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतोय. सोशल मीडियावर अनेकांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. अशात अक्षय कुमारचा असा एक फोटो समोर आला की, ट्रोलर्सच्या हाती जणू आयतं कोलित सापडलं.
अक्षयचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोतील अक्षयचा अवतार बघून क्षणभर तुम्हालाही धक्का बसेल. फाटलेला मळलेला कुर्ता, विसकटलेले केस आणि हातात चहाचा कप घेऊन अक्षय बसलेला दिसतोय. त्याचा हा अवतार पाहून अनेक जणांना धक्का बसला. अनेकांनी यावरून अक्कीला ट्रोल करायला सुरूवात केली.
‘गुटख्याची जाहिरात करशील तर लोकांच्या नजरेतून उतरणारच ना,’ अशा कमेंट लोकांनी केल्या. ‘लगता है किसी डायरेक्टरने चेक नहीं दिया,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘पैसा नहीं कमायेगा तो विमल कैसे खायेगा मेरी जान,’ अशी कमेंट अन्य एकाने केली. ‘विमल खाने का असर,’ अशी कमेंट करत एका युजरने त्याला ट्रोल केलं.
सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय बच्चन पांडे, रक्षाबंधन, राम सेतू, सेल्फी, मिशन सिंड्रेला अशा अनेक चित्रपटांत तो झळकणार आहे. द एंड या सीरिजमधून तो डिजिटल डेब्यूही करतोय.