Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिचा बांद्रामध्ये प्रत्येक इमारतीत एक एक फ्लॅट...", अक्षय कुमारने 'या' अभिनेत्रीची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:22 IST

कोणाबद्दल बोलतोय अक्षय कुमार? अभिनेत्रीनेही दिलं उत्तर

अभिनेता अक्षय कुमार गेल्या तीन दशकांपासून इंडस्ट्रीत आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काजोल, करीना कपूर, करिश्मा कपूर, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याची केमिस्ट्री गाजली. नुकतंच अक्षय आणि करिश्मा कपूर एकाच स्टेजवर आले होते. तेव्हा अक्षयने तिची पोलखोल केली. करिश्माचा वांद्रातील प्रत्येक इमारतीत एक एक फ्लॅट असल्याचं तो म्हणाला. यावर करिश्माने काय उत्तर दिलं वाचा.

अक्षय कुमार सोनी टीव्हीवरील 'व्हील ऑफ फॉर्च्युन'शोचा होस्ट आहे. या शोमध्ये अक्षय कुमारची पहिली हिरोईन करिश्मा कपूर आली होती. तिच्यासोबत अनु मलिक आणि मौनी रॉयही होते. यावेळी अक्षयने करिश्माची चांगलीच चेष्टा केली. दोघांनी ३४ वर्ष जुन्या 'दीदार हो गया मुझको प्यार हो गया' गाण्यावर डान्स केला. अक्षय म्हणाला,'तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की ही माझी पहिली हिरोईन आहे. मी तिच्यासोबत माझा पहिला सिनेमा केला होता. माझं पहिलं गाणंही तिच्यासोबतच आहे. मी करिश्माला सांगू इच्छितो की ती किती सुंदर आहे.' यावर करिश्मा 'थँक यू' म्हणाली.

पुढे अक्षय मजेत म्हणाला,'बांद्रा मधील प्रत्येक इमारतीत तिचा एक एक फ्लॅट आहे.' अनु मलिक यांनीही अक्षयची साथ दिली आणि म्हणाले, 'अक्षय कधीच खोटं बोलत नाही'. यावर करिश्मा म्हणाली, 'तुम्हाला माहित असेल अक्षय कुमार पूर्ण जुहूचा मालक आहे.' यावर अक्षय पुढे सांताक्रुझ आणि खारचं नावंही जोडतो आणि नंतर एकच हशा पिकतो.

'दीदार' सिनेमा १९९२ साली आला होता. यामध्ये अक्षय आणि करिश्मा मुख्य भूमिकेत होते. यामध्ये अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, तनुजा, विजू खोटे यांचीही भूमिका होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar reveals Karisma Kapoor owns flats in Bandra buildings.

Web Summary : On a TV show, Akshay Kumar joked that Karisma Kapoor owns a flat in every building in Bandra. Karisma retorted that Akshay owns all of Juhu, leading to laughter.
टॅग्स :अक्षय कुमारकरिश्मा कपूरबॉलिवूड