Join us

डिजिटल डेब्यूसाठी इतकं मोठं मानधन घेत आहे 'खिलाडी' अक्षय कुमार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 13:26 IST

एका मोठ्या इव्हेंटमध्ये त्याने याबाबत हिंटही दिली होती की, त्याचा हा शो अ‍ॅक्शन पॅक्ड होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयचा मुलगा आरवने त्याला OTT प्लॅटफॉर्म सीरीज करण्यासाठी तयार केलं आहे.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता आहे. गेल्यावर्षी त्याने घोषणा केली होती की, 'The End' सोबत तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. एका मोठ्या इव्हेंटमध्ये त्याने याबाबत हिंटही दिली होती की, त्याचा हा शो अ‍ॅक्शन पॅक्ड होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयचा मुलगा आरवने त्याला OTT प्लॅटफॉर्म सीरीज करण्यासाठी तयार केलं आहे.

ही सीरीज करण्यासाठी अक्षयला तयार करण्यात त्याचा मुलगा आरवचा मोठा हात मानला जात आहे. तसेच अशीही चर्चा आहे की, अक्षयने हा प्रोजेक्ट तगड्या मानधनामुळे स्वीकारलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारला या वेबसीरीजसाठी ९० कोटी रूपये मानधन दिलं गेलं आहे. प्रोजेक्टशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, सुरूवातीला अक्षय डिजिटल सीरीजसाठी तयार नव्हता. पण अ‍ॅमेझॉनने त्याला फार मनवलं.

दरम्यान, अक्षय कुमार FAU-G गेमची घोषणा केली. त्याने PUBG हा चायनीज गेम बंद झाल्यावर ही घोषणा केली. अक्षयने ट्विट केलं होतं की,  पंतप्रधानाच्या आत्मनिर्भर अभियानाला सपोर्ट करत या अ‍ॅक्शन गेमची घोषणा करताना त्याला गर् होत आहे.  मनोरंजनासोबतच हा गेम खेळणाऱ्यांना आपल्या सैनिकांच्या त्यागाबाबतही जाणून घेता येईल. यातून मिळणारा २० टक्के पैसा वीर ट्रस्टला डोनेट केला जाणार आहे. 

हे पण वाचा :

अ‍ॅप नाही नोकरी द्या....! अक्षय कुमारवर संतापले नेटकरी, म्हणाले ‘फेकू जी’

'या' व्यक्तीने पाजला अक्षय कुमारला हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा, व्हिडीओ व्हायरल

जे बात! जगातल्या सगळ्यात महागड्या अभिनेत्यांमध्ये एकटा बॉलिवूड खिलाडी, इतकी केली कमाई

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड