Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG साठी अक्षय कुमारने सोडली होती 'ही' गोष्ट, आजही पाळतोय आईची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 16:18 IST

११ वर्षांपूर्वी 'ओएमजी' सिनेमा रिलीज झाला होता.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. त्याचे सलग ४ ते ५ सिनेमे फ्लॉप झाले आहेत. आता आगामी 'ओह माय गॉड 2' (OMG 2) सिनेमाकडून त्याला अपेक्षा आहेत. 'ओएमजी 2' मध्ये अक्षयसोबत पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी झळकणार आहे. सिनेमात अक्षय भोलेनाथच्या लुकमध्ये दिसत आहे. तुम्हाला माहितीये का अक्षयने 'ओएमजी' च्या पहिल्या भागावेळीच त्याचा फेवरेट पदार्थ खाणंच सोडलं होतं.

११ वर्षांपूर्वी 'ओएमजी' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते. या सिनेमात अक्षयला श्रीकृष्णाच्या भूमिकेत खूपच पसंत केलं गेलं होतं. मात्र या भूमिकेसाठी त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात मोठे बदल केले होते. माध्यम रिपोर्ट्सनुसार, अक्षयच्या आईने त्याला सिनेमाचं शूट सुरु करण्याआधी त्याला मांसाहारी आहार बंद करायला सांगितला होता. जोवर मांसाहार सोडत नाही तोवर श्रीकृष्णाची भूमिका योग्य पद्धतीने साकारु शकणार नाहीस. म्हणून या भूमिकेसाठी अक्षयने नॉनव्हेज खाणं सोडलं आणि त्यानंतर तो शाकाहारीच बनला. 

तर आता ओएमजी चा पार्ट २ येत आहे. ११ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये अक्षय कुमार भोलेनाथच्या भूमिकेत दिसत आहे. लांब जटा, कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्ष असा त्याचा लुक आहे. हाही लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्यामुळे आता पहिल्या भागासारखाच दुसरा भागही सुपरहिट होणार का पाहणं महत्वाचं असणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारअन्नबॉलिवूड