Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची मालिका संपली? 'स्काय फोर्स'ला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:05 IST

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'स्काय फोर्स' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (sky force)

'स्काय फोर्स' सिनेमाची खूप चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतोय याकडे सर्वांचं लक्ष होतं. गेल्या काही महिन्यांपासून 'स्काय फोर्स'मधील गाणी इतकंच नव्हे तर टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. त्यामुळे 'स्काय फोर्स' रिलीज झाल्यावर कमाई किती करतोय याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर 'स्काय फोर्स' सिनेमाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. कमाईचे आकडे पाहता 'स्काय फोर्स'मुळे अक्षय कुमारच्या मागचा फ्लॉप सिनेमांचा सिलसिला संपतोय अशी शक्यता आहे. (sky force box office collection)

पहिल्या दिवशी 'स्काय फोर्स'ने कमावले इतके कोटी

'स्काय फोर्स' सिनेमाचा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. सैकनिल्कने दिलेल्या आकड्यांनुसार 'स्काय फोर्स' सिनेमाचे पहिल्या दिवशीचे आकडे समाधानकारक आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केलीय. 'स्काय फोर्स'चं बजेट साधारण १६० कोटी इतकं आहे. त्यामानाने सिनेमाला अजून बरीच कमाई लागेल. परंतु पहिल्या दिवशीचे आकडे मात्र चांगले म्हणता येतील.

अक्षयच्या फ्लॉप सिनेमांची मालिका संपली

'स्काय फोर्स' सिनेमामुळे अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची मालिका संपणार अशी शक्यता निर्माण झालीय. २०२४ मध्ये अक्षय कुमारचे जे सिनेमे रिलीज झाले, त्या दृष्टीने 'स्काय फोर्स'ची कमाई चांगली म्हणता येईल. 'सरफिरा', 'खेल खेल में', 'बडे मिया छोटे मिया' हे अक्षयचे मागील तिनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरलेले. त्यामुळे 'स्काय फोर्स'ची कमाई इतर तीन सिनेमांच्या तुलनेत चांगली आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमारसोबत वीर पहारिया, सारा अली खान या कलाकारांनी काम केलंय.

 

 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसारा अली खान