Join us

अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ला तारणार का चहा अन् समोसे? सिनेमाची विशेष ऑफर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 13:18 IST

अक्षय कुमारच्या सरफिराची कमाई वाढावी म्हणून निर्मात्यांनी खास ऑफर ठेवली आहे. याचा सिनेमाच्या कमाईमध्ये फायदा होणार का, हे पाहावं लागेल (sarfira, akshay kumar)

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयचा नवीन सिनेमा नुकताच रिलीज झालाय. त्याचं नाव 'सरफिरा'. यावर्षी अक्षय कुमारचा 'बडे मिया छोटे मिया' सिनेमा फ्लॉप ठरला. त्यानंतर अक्षयच्या 'सरफिरा'कडे सर्वांचं लक्ष होतं. 'सरफिरा' चांगली कमाई करेल असं वर्तवलं जात होतं. पण 'सरफिरा'सुद्धा फ्लॉप होण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे सिनेमाच्या टीमने लोक सिनेमा पाहायला थिएटरकडे यावेत म्हणून तिकीटासोबत खास ऑफर ठेवली आहे.

अक्षय कुमारच्या 'सरफिरा'वर खास ऑफर

अक्षय कुमारचा 'सरफिरा' सिनेमा शुक्रवार १२ जुलैला रिलीज झालाय. या सिनेमाची कमाई अनपेक्षितरित्या खूप कमी कमाई झाली. अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांची  मालिका 'सरफिरा' मोडून काढेल असं वाटत होतं. पण असं होताना दिसत नाहीय. त्यामुळे सिनेमाच्या टिमने प्रेक्षकांसाठी एक विशेष ऑफर ठेवली आहे. प्रसिद्ध मल्टिप्लेक्स चेन INOX ने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. ऑफर अशी आहे की, प्रेक्षकांना तिकिटांसह एक चहा आणि दोन समोसे पूर्णपणे मोफत मिळतील. इतकंच नाही तर तुम्हाला ऑर्डरसोबत सिनेमाचं खास मर्चंडाईजही मोफत मिळणार आहे.

 

अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ची कमाई

बॉक्स ऑफिसवर 'सरफिरा'ची निराशाजनत कामगिरी दिसून आली. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ २.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी कलेक्शनमध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली आणि सिनेमाने ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे सिनेमाने आतापर्यंत ६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या खास ऑफरचा 'सरफिरा'ला फायदा होणार का? हे पाहणं औत्सुक्याचा विषय आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड