सध्या 'धुरंधर' सिनेमाची सर्वत्र खूप चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमाची रिलीजच्या आधीपासूनच खूप चर्चा होती. 'धुरंधर' सिनेमा पाहायला प्रेक्षकही थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत. अशातच 'धुरंधर' सिनेमा पाहून अक्षय कुमारने एका वाक्यात लिहिलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यात अक्षय कुमारने 'धुरंधर'मधील रहमान डकैत अर्थात अक्षय खन्नाला उद्देशून एक वाक्य लिहिलं आहे. काय म्हणाला?अक्षय कुमारची पोस्ट व्हायरल
झालं असं की, अक्षय खन्नासारख्या जबरदस्त अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये चांगली संधी दिल्याबद्दल लोक अक्षय कुमारचे आभार मानत आहेत. यामागचं कारण असं की, २००९ मध्ये आलेल्या फराह खान दिग्दर्शित 'तीस मार खान' या चित्रपटातील एक जुना सीन व्हायरल झाला आहे. या सीनमध्ये अक्षय कुमार एका चित्रपट दिग्दर्शकाची भूमिका करतो आणि तो अक्षय खन्नाला चित्रपटाची ऑफर देतो.
एका चाहत्याने याच सीनचा एक फोटो 'एक्स' हँडलवर शेअर केला आणि अक्षय कुमारला टॅग करत लिहिले, "या देशाला इतका अद्भुत अभिनेता दिल्याबद्दल दिग्दर्शक साहेब, तुमचे धन्यवाद." चाहत्याच्या या पोस्टवर अक्षय कुमारने आपल्या खास विनोदी शैलीत उत्तर दिले. अक्षय कुमारने लिहिले, "कधीच या गोष्टीचा गर्व नाही केला भाई… कधीच गर्व नाही केला."
'धुरंधर' पाहून अक्षय कुमार काय म्हणाला?
त्याआधी अक्षय कुमारने 'धुरंधर' पाहून पोस्ट लिहिली की, "मी धुरंधर पाहिला आणि मी पूर्णपणे भारावून गेलो आहे. किती प्रभावी कथा आहे आणि आदित्य धर तू कमाल केली आहेस. आपल्या कथा प्रभावीपणे सांगितल्या जाणे आवश्यक आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेले प्रेम पाहून आनंद झाला.", अशाप्रकारे अक्षय कुमारला 'धुरंधर' आवडला असल्याचं त्याने सांगितलं आहे.
Web Summary : Akshay Kumar lauded Akshay Khanna's performance in 'Dhurandhar'. A fan thanked Kumar for giving Khanna a chance, referencing their film 'Tees Maar Khan'. Kumar responded humorously. He also praised director Aditya Dhar for the film's impactful storytelling.
Web Summary : अक्षय कुमार ने 'धुरंधर' में अक्षय खन्ना के प्रदर्शन की सराहना की। एक प्रशंसक ने खन्ना को मौका देने के लिए कुमार को धन्यवाद दिया, 'तीस मार खान' का हवाला दिया। कुमार ने हास्यपूर्ण जवाब दिया। उन्होंने निर्देशक आदित्य धर की भी प्रशंसा की।