Join us

दिलदार सुपरस्टार! इमरान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर अक्षय मदतीसाठी आला होता धावून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 15:40 IST

इमरानने लिहिले की, तो अक्षयला पहिल्यांदा ईदच्या पार्टीला भेटला होता. तिथेच 'वन्स अपॉन टाइन इन मुंबई २' बाबत बोलणं झालं होतं. मजेदार बाब ही आहे की, अक्षय कुमार जी भूमिका साकारत होता ती भूमिका प्रीक्वलमध्ये इमरान हाश्मीने साकारली होती.

काही वर्षांआधी इमरान हाश्मीचा मुलगा अयान हाश्मी याला कॅन्सरचं निदान झालं होतं. मुलाचा कॅन्सर बरा झाल्यानंतर इमरानने 'किस ऑफ लाइफ- हाऊ अ सुपरहीरो अ‍ॅंड माय सन डिफीटेड कॅन्सर' नाावाचं पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकात त्याने खुलासा केला होता की, कशाप्रकारे अक्षय कुमार त्याच्या मदतीसाठी पुढे आला होता. इमरानने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की, चिंतेच्या काळात अक्षयने त्याच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. मुलाला कॅन्सर झाल्याची माहिती मिळताच अक्षयने फोन केला होता आणि म्हणाला होता की, कशाप्रकारचीही मदत लागली तर फोन करू शकतो.

इमरानने लिहिले की, तो अक्षयला पहिल्यांदा ईदच्या पार्टीला भेटला होता. तिथेच 'वन्स अपॉन टाइन इन मुंबई २' बाबत बोलणं झालं होतं. मजेदार बाब ही आहे की, अक्षय कुमार जी भूमिका साकारत होता ती भूमिका प्रीक्वलमध्ये इमरान हाश्मीने साकारली होती. इमरानने पुढे लिहिले होते की,  पहिल्या भेटीनंतर जेव्हा एक वर्षाने त्याचा मुलगा पहिल्या सर्जरीनंतर रिकव्हर झाला होता तेव्हा त्याला मेसेज आला होता. त्यात लिहिले होते की, 'हाय, मी अक्षय कुमार, प्लीज फ्री असशील तर फोन कर. इमरानने लगेच फोन केला. तेव्हा अक्षय म्हणाला की, 'तुझ्या मुलाबाबत जे ऐकलं ते खरंय का? इमरान सांगितले की, ट्यूमर काढूव टाकला. किडनी नाही वाचवू शकले तर ती पण काढावी लागली.

अक्षयच्या वडिलांना होता कॅन्सर

त्यानंतर अक्षयने त्याला विचारले की, किती वेळ हॉस्पिटलमध्ये, तो येतोय. पण इमरानने नको सांगितले. यावर अक्षय त्याला म्हणाला होता की, कोणत्याही गोष्टी गरज लागली तर फोन कर. इमरानने सांगितले की, अक्षय मुलाच्या तब्येतीबाबत विचारणा करण्यासाठी रोज फोन करत होता. मुलगा घरी आला तेव्हा अक्षय त्याला भेटायला घरी आला आणि त्याला जेव्हा कळाले की, मुलगा चार वर्षांचाही नाहीय तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. इमरानला नंतर कळालं की, अक्षय कुमारच्या वडिलांनाही कॅन्सर होता. कदाचित त्यामुळे अक्षय कुमार इमरानच्या मुलाबाबत इतका इमोशनल होता.

सलमान खानबद्दल बोलताना सुशांत म्हणाला होता "मुझे बहोत डर लगता है......."

'या' 5 सुपरस्टार्सना मिळालेला पहिला पगार वाचून व्हाल अवाक्, तुमचा विश्वासही बसणार नाही!

वाह बेबो तुस्सी ग्रेट हो!, प्रेग्नेंट असूनही करिना कपूर करतेय खूप काम, फोटो शेअर करत म्हणाली- माझे योद्धा

टॅग्स :इमरान हाश्मीअक्षय कुमारबॉलिवूड