Join us

Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:26 IST

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सर्वत्र 'हाऊसफुल ५'ची (Housefull 5) चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर धुमाकूळ घातला आहे. खास गोष्ट म्हणजे, मराठी तडका असलेलं 'द फुगडी डान्स' गाणं पाहून तर चाहते दिवाने झाले आहेत. काल रविवारी १ जून रोजी 'हाऊसफुल ५'ची संपूर्ण टीम पुण्यातील सीझन्स मॉलमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन्ही कलाकार फुगडी डान्स करताना दिसत आहेत.

अक्षयने हा फुगडी डान्स व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आज पुण्यात नाना पाटेकर यांच्यासोबत 'हाऊसफुल ५' मधील फुगडी डान्स केला. यासोबतच त्याने कॅप्शनद्वारे चाहत्यांना फुगडी डान्स ट्राय करण्याचा सल्लाही दिला आहे. अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा फुगडी डान्स चाहत्यांना पसंत पडला आहे. हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट? 

प्रसिद्ध बॉलिवूड कॉमेडी चित्रपट फ्रँचायझी 'हाऊसफुल'चा पाचवा भाग लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल ५' मध्ये कलाकारांची फौज  आहे. या चित्रपटात ३, ४ नाही तर एकूण १८ स्टार मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट ६ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाबद्दल लोक खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :अक्षय कुमारनाना पाटेकरनृत्यपुणे