Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवीन टायटलसह प्रदर्शित झाले ‘लक्ष्मी’ सिनेमाचे नवीन पोस्टर, कियाराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 15:44 IST

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित होताच या पोस्टरने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरवर कियाराचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय.

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अक्षय कुमार यांचा मुख्य भूमिका असलेला 'लक्ष्मी' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विविध कारणामुळे सिनेमावर सध्या चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या टायटलवरूनही प्रचंड राडा झाला. इतका की अखेर मेकर्सला ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलावे लागले. त्यामुळे सिनेमाचे नवीन पोस्टर नवीन टायटलनुसार प्रदर्शित करण्यात आले आहे.  

पोस्टर प्रदर्शित होताच  या पोस्टरने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  पोस्टरवर कियाराचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. अक्षय कुमारने ट्वीट करत लिहीले की, लवकरच प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे.

तेव्हा आपल्या कुटुंबासह सज्ज व्हा. येत्या  9 नवंबरला सिनेमा तुमचे मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होत आहे. सध्या हे पोस्टर ट्विटरवर ट्रेंड होत आहे. 

म्हणून ठेवले होते ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ 

या नावावर स्पष्टीकरण देताना सिनेमाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, आमच्या तमिळ सिनेमाचे मुख्य कॅरेक्टर कंचना होते. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचे एक रूप मानले जाते. आधी आम्ही हिंदीतही ‘कंचना’ हेच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी आॅडिअन्सना अपील करू शकू. मग ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव फायनल झाले.

देवाच्या कृपेने हे कॅरेक्टर सिनेमात धमाक्यासारखा येते. त्यामुळे आम्ही हिंदी सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवल्से. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा धमाका कधी मिस होत नाही त्याचप्रमाणे या सिनेमातील मुख्य भूमिकाही एक ट्रान्सजेंडर आहे आणि तो शक्तिशाली आहे. त्यामुळे हे टायटल आमच्या सिनेमासाठी पूर्णपणे योग्य आहे.

हे दोन बदल ठरले वादाचे कारण 

काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. लक्ष्मी बॉम्ब या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाना होता.

या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

 

टॅग्स :कियारा अडवाणीअक्षय कुमार