बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षय उत्कृष्ट अभिनेता आहेच शिवाय तो कायम देशाप्रती त्याचं कर्तव्य बजावताना दिसतो. अक्षयने भारताचं नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी त्याचं व्होट दिलंय. अक्षयने सकाळी लवकर जाऊन गर्दी व्हायच्या आधी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे. अक्षयचा मतदान केंद्राबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
अक्षयने बजावला मतदानाचा हक्क
अक्षयने त्याच्या स्टाफसह गाडीमधून उतरुन मतदान केंद्रावर हजेरी लावली. अक्षयच्या आधी मतदान केंद्रावर काही लोक उपस्थित होते. कोणतीही घाईगडबड न करता अक्षयने शांतपणे मतदान केलं. अक्षयला पाहण्यासाठी सर्वसामान्य माणसांची गर्दी जमली होती. अक्षयने सर्वांची दखल घेतली. कोणालाही नाराज केलं नाही. पुढे मतदान केंद्राबाहेर उपस्थित मीडियासमोर अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच अक्षयने विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं.
अक्षयने मतदान केल्यानंतर काय म्हणाला?
अक्षयला मीडियाने मतदानाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या. अक्षय म्हणाला की, "खूप चांगली सोय केली आहे. सफाई सुद्धा चांगली ठेवलीय. याशिवाय ज्येष्ठ नागरीकांची सुद्धा चांगली काळजी ठेवण्यात आलीय." आणि मग शेवटी अक्षयने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. अशाप्रकारे अक्षयने भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे.