दिग्गज विनोदी अभिनेते असरानी यांचं काल निधन झालं. 'अंग्रेजो के जमाने के जेलर' हा त्यांचा डायलॉग आजही सर्वांना लक्षात आहे. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने लहानांपासून मोठ्यांना खळखळून हसवलं. असरानी अक्षय कुमारच्या आगामी 'हैवान' आणि 'भूत बंगला' या दोन्ही सिनेमांमध्ये दिसणार होते. आता त्यांच्या आठवणीत अक्षय भावुक झाला आहे.
अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिले, "असरानी यांच्या निधनाची बातमी कळली आणि मी स्तब्ध झालो. एक आठवड्यापूर्वीच आम्ही 'हैवान'च्या शूटिंगवेळी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. खूपच प्रेमळ माणूस होता. त्यांच्या कॉमिक टायमिंगला तर तोडच नव्हती. 'हेरा फेरी' पासून 'भागम भाग','दे दना दन','वेलकम', आणि आता 'भूत बंगला','हैवान' या माझ्या सर्वच सिनेमांमध्ये मला त्यांच्यासोबत काम करता आलं आणि खूप काही शिकता आलं. आमच्या इंडस्ट्रीचं आज मोठं नुकसान झालं आहे. आम्हाला हसण्यासाठी लाखो कारणं दिलीत देवाचा तुमच्यावर असाच आशीर्वाद कायम असू दे. ओम शांती."
अक्षय कुमारने असरानींसोबतचा एका सिनेमातील सीनमधलाच छानसा फोटो शेअर केला आहे. यामध्ये असरानींच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच गोड हसू आहे. आज त्यांच्या निधनानंतर सर्वच शोक व्यक्त करत आहेत. अभिनेते अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर करत आज मन जड झाल्याचं म्हटलं आहे. याशिवाय इतरही सेलिब्रिटींनी असरानींना श्रद्धांजली वाहिली आहे.
असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होतं. ते पंजाबचे होते. पुण्यातील एफटीआयआयमधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि नंतर करिअरला सुरुवात केली. 'शोले'तील त्यांची भूमिका आणि डायलॉगने त्यांना ओळख मिळवून दिली. तसंच सुपरस्टार राजेश खन्नांसोबत त्यांनी २५ सिनेमांमध्ये काम केलं होतं. राजेश खन्ना असरानींना त्यांचा 'लकी मॅस्कॉट' मानायचे.
Web Summary : Akshay Kumar mourns the death of veteran actor Asrani, known for his comedic roles. Akshay recalls their recent meeting on the set of 'Haiwaan'. He remembers Asrani's comic timing and their collaborations in films like 'Hera Pheri'.
Web Summary : अक्षय कुमार ने दिग्गज अभिनेता असरानी के निधन पर शोक व्यक्त किया, जो अपनी हास्य भूमिकाओं के लिए जाने जाते थे। अक्षय ने फिल्म 'हैवान' के सेट पर हुई हालिया मुलाकात को याद किया। उन्हें असरानी का कॉमिक टाइमिंग और 'हेरा फेरी' जैसी फिल्मों में उनका सहयोग याद है।