Bhoot Bangla Movie: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ' भूत बंगला ' या हॉरर-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवळपास १६ वर्षानंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत.नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याच्या रिलीज डेटवरून देखील पडदा हटविण्यात आला आहे. त्यामुळे अक्षयचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.
दरम्यान, हा चित्रपट आधी १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलून ती १७ एप्रिल २०२६ केली आहे. शिवाय सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला. १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपासून या चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यू' सुरू होतील. मात्र, जवळजवळ एक आठवड्याने रिलीज डेट पुढे ढकळल्यामुळे मनोरंजन विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. धुरंधर २ मुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदल्याचे अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. अशातच या सगळ्या अफवांचं खंडण करत निर्माती एकता कपूरने यावर मौन सोडलं आहे.
अलिकडेच 'व्हायरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत एकता कपूर म्हणाली, "आज चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. येत्या १६ तारखेला चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू होईल आणि चित्रपट १७ तारखेला प्रदर्शित होईल.त्यानंतर धुरंधर २ बद्दल होणाऱ्या चर्चांवर उत्तर देत एकता कपूर म्हणाली, आम्ही हा निर्णय 'धुरंधर २' मुळे घेतला नाही. १० एप्रिलला सुद्धा चित्रपटासाठी आम्हाला अधिक चांगल्या आणि मोठ्या स्क्रीन्स मिळाल्या असत्या.जर धुरंधर २ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असेल तर उत्तमच आहे. या चित्रपटाशी आमची कुठलीही स्पर्धा नाही."
मग पुढे ती म्हणाली,"हा एक कुटुंबासोबत एकत्र पाहता यावा असा सिनेमा आहे. आणि सर्वसाधारण कुटुंबातील लोक फक्त एकाच चित्रपटावर पैसे खर्च करू शकतात. त्यामुळे आमच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं तशा प्रकारे मनोरंजन झालं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर, मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही एक उत्तम संधी आहे, ज्यामुळे आमच्या चित्रपटाला फायदा होईल."
दरम्यान, या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच,परेश रावल, राजपाल यादव, तब्बू, वामिका गब्बी तसेच मिथिला पालकर अशा कलाकारांची फळी आहे.
Web Summary : Akshay Kumar's 'Bhoot Bangla' release shifted to April 17, 2026. Producer Ekta Kapoor denied rumors that 'Dhurandar 2' caused the delay, citing better screen availability and summer holidays as reasons. She emphasized the film's family-friendly appeal.
Web Summary : अक्षय कुमार की 'भूत बंगला' की रिलीज 17 अप्रैल, 2026 तक खिसक गई। निर्माता एकता कपूर ने 'धुरंधर 2' के कारण देरी की अफवाहों का खंडन किया, बेहतर स्क्रीन उपलब्धता और गर्मी की छुट्टियों को कारण बताया। उन्होंने फिल्म की पारिवारिक अपील पर जोर दिया।