Join us

जिला क्यों नहीं घोषित कर देते...! ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर धमाकेदार, Memes त्याहूनही धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:54 IST

मीम्सचा धुमाकूळ!

ठळक मुद्देयेत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अक्षय कुमार पुन्हा एकदा अ‍ॅक्शन चित्रपट घेऊन येतोय. चित्रपटाचे नाव आहे, ‘सूर्यवंशी’. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा हा तिसरा चित्रपट. यापूर्वी ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ हे सिनेमे आपण पाहिलेत. आता पुन्हा एकदा रोहित शेट्टीच्या खास स्टाईलचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. म्हणजे काय तर हवेत उडणाºया गाड्या आणि वेगवेगळे स्टंट.कालच ‘सूर्यवंशी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार तर आहेच शिवाय रणवीर सिंग आणि अजय देवगणची धम्माल पाहायला मिळतेय. या ट्रेलरवरचे मीम्सही तेवढेच धम्माल आहेत. होय,‘सूर्यवंशी’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर एकापेक्षा एक भारी मीम्सचा पाऊस पडला. मीम्समध्ये रणवीर सिंग सगळ्यांवर भारी पडला आहे. तेव्हा पाहा आणि हसा...

टॅग्स :सूर्यवंशीअक्षय कुमाररणवीर सिंगअजय देवगण