Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे माझे शोषणचं...! खासगी फोटो लीक झाल्यानंतर पहिल्यांदा बोलली अक्षरा हासन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 12:14 IST

गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते. या फोटोंत  अक्षरा हासन अंडरगारमेंटमध्ये दिसत असून सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटो अ‍ॅक्ट्रेस दीवाना नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आले होते. या प्रकारानंतर अक्षराने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय यावर चुप्पी तोडत, हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

‘अलीकडे माझे काही खासगी फोटो लीक झालेत. ज्याने कुणी हे केलेय, त्याला ना मी ओळखत, ना तो मला ओळखत. मला फक्त एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे एका तरूण मुलीसोबत असा प्रकार होणे अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही तुमच्या मजेसाठी कुणासोबत असला प्रकार करू शकत नाही. माझे फोटो लीक करणाºया व्यक्तिसोबतच, हे फोटो कॅची हेडलाईन्ससह प्रकाशित करणाºयांनीही एकप्रकारे माझे शोषणचं केले आहे. देशात मीटू मोहिम सुरू असताना एखाद्याची असे करण्याची हिंमत व्हावी, हेही दुर्दैवी आहे. मी यासंदर्भात मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे. ज्याने कुणी हे केलेय, त्याचा शोध लवकरच लागेल, याचा मला विश्वास आहे,’असे अक्षराने लिहिले आहे.         अक्षराने २०१५ मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘शमिताभ’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. चित्रपटात ती धनुषची प्रेयसी होती. ‘शमिताभ’नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही ‘विवेगम’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.  अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट ‘सुभाष नायडू’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

टॅग्स :अक्षरा हासनकमल हासन