Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूरसोबत अजिंक्य देव यांनी काढला सेल्फी, 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 09:19 IST

अजिंक्य देव 'रामायण' सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील स्टार अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) सध्या चर्चेत आहे. रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) आगामी बहुपचर्चित 'रामायण' (Ramayan) सिनेमातअजिंक्य देव सुद्धा एक भूमिका साकारणार आहेत. याच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कालच अजिंक्य देव यांनी सोशल मीडिया पोस्ट करत रणबीर कपूरसोबत सेल्फी शेअर केला. यावरुनच दोघंही 'रामायण' एकत्र आले हे स्पष्ट होत आहे. 

अजिंक्य देव यांनी काही दिवसांपूर्वीच टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत 'रामायण' सिनेमावर शिक्कामोर्तब केला. बऱ्याच काळानंतर ते पुन्हा हिंदीत दिसणार आहेत. ८० च्या दशकात अजिंक्य देव यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. 'माहेरची साडी' हा सिनेमा आयकॉनिक ठरला. तसंच अजिंक्य देव यांचं डॅशिंग व्यक्तिमत्व, हँडसम लूक यावर प्रेक्षक फिदा झाले होते. आता पुन्हा त्यांची जादू पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांनी नुकतेच फेसबुकवर दोन फोटो शेअर केलेत. एका फोटोत रणबीर कपूर तर दुसऱ्या फोटोत नीतू सिंह आहेत. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले,'गेल्या वर्षी नीतूजींसोबत तर यावर्षी रणबीर कपूरसोबत.'

तसंच आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी इतर Kapoor's सोबतचे  फोटो शेअर केलेत. यामध्ये करिष्मा कपूरही दिसत आहे. अजिंक्य देव यांची एक वेबसीरिज रिलीज होणार आहे ज्यात त्यांनी करिष्मासोबत काम केलं आहे. त्यांचे मोठे भाऊ अभिनय देव यांनीच सीरिज दिग्दर्शित केली आहे. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/2138201403201654/}}}}

अजिंक्य देव हे मराठी, हिंदीतील सुपरस्टार रमेश देव यांचे धाकटे चिरंजीव आहेत. अजिंक्य देव यांनी 'सर्जा', 'कशासाठी प्रेमासाठी', 'माहेरची साडी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता 'रामायण' सिनेमात ते महर्षी विश्वामित्र या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :अजिंक्य देवरणबीर कपूररामायणसिनेमाबॉलिवूडमराठी अभिनेता