Join us
Daily Top 2Weekly Top 5

करण जोहरला मोठा धक्का! कार्तिक अन् जान्हवीनंतर 'दोस्ताना २' मधून 'या' अभिनेत्याने घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:21 IST

कार्तिक अन् जान्हवीनंतर 'दोस्ताना २' मधून 'या' अभिनेत्याने घेतली एक्झिट, समोर आलं मोठं कारण

Dostana 2:करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला 'दोस्ताना २'हा चित्रपट सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निर्मिती असंख्य अडचणी येताना दिसत आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवानी हे मुख्य भूमिकेत दिसणार होते, परंतु काही कारणास्तव कार्तिकने या प्रोजेक्टमधून माघार घेतली. त्यानंतर जान्हवी कपूरनेही हा चित्रपट सोडला. अशातच आता पुन्हा एकदा 'दोस्ताना २' बद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे.

करण जोहरच्या दोस्तानापेक्षा त्याच्या कास्टिंगबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता विक्रांत मेस्सीने तो या प्रोजेक्टशी जोडला गेल्याची हिंट दिली होती.त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेता लक्ष्य लालवानीने देखील या चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं बोललं जात आहे.  परंतु, निर्मात्यांनी किंवा स्वत:लक्षनेही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

लक्ष लालवानीने सोडला 'दोस्ताना २'?

'दोस्ताना २' ची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी यांना मुख्य भूमिकेत असतील अशी चर्चा होती. कालांतराने, चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये  अनेक बदल झाले आणि कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी या सिनेमातून एक्झिट घेतली. विक्रांत मेस्सी यांच्यासोबत रोमँटिक कॉमेडीमध्ये  मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टीला फायनल करण्यात आलं आहे. शिवाय लक्ष्य लालवानी या प्रोजेक्टचा भाग असणार असंही सांगण्यात आलं होत.

मिळालेल्या माहितीनुसार,'दोस्ताना २' चे शूट खूप आधीच सुरू होणार होतं, परंतु कास्टिंग फायनल न झाल्याने अजून उशीर होत आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया देखील सुरू आहे, असं कळतंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Another Blow to Karan Johar! Lakshya Exits 'Dostana 2'.

Web Summary : 'Dostana 2' faces more casting woes. After Kartik and Janhvi, Lakshya Lalwani reportedly exits the film. Uncertainty surrounds the film's production and cast.
टॅग्स :कार्तिक आर्यनजान्हवी कपूरकरण जोहरबॉलिवूडसिनेमा