बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून (Playback Singing) निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ माजली असतानाच, आता लोकप्रिय संगीतकार आणि गायक विशाल ददलानी याने यावर आपली भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे, विशालने केवळ अरिजीतच्या निर्णयाचे समर्थनच केले नाही, तर भविष्यात माझाही असाच निर्णय घेण्याचा विचार आहे, हे त्याने बोलून दाखवलं आहे.
काय म्हणाला विशाल ददलानी? एका मुलाखतीत विशाल ददलानीने सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याशी संबंधित निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यासाठी कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही. अरिजीतबद्दल बोलताना तो म्हणाला, “प्रत्येकाला इतरांच्या प्रश्नांना उत्तरं न देता स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्क आहे. त्याचा निर्णय चूक की बरोबर, याचा आपण विचार करण्याची गरज नाही. तो त्याच्या संगीताच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचेल तेव्हा आपण त्याचा आनंद घेऊ शकतो.”
विशाल पुढे म्हणाला, “शेवटी तुम्हाला स्वतःसाठी जगावे लागते. अरिजीतबद्दल सांगायचे तर, माझ्या भावा, स्वतःसाठी जग. मी त्याच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहे. खरं तर, माझाही भविष्यात असाच निर्णय घेण्याचा विचार आहे. तुम्ही तुमचे काम आनंदाने आणि प्रेमाने केले पाहिजे.”
विशालने सोशल मीडियावर लिहिले की, यश म्हणजे मानसिक शांती किंवा समाधानाची गॅरंटी नसते. पैसा आणि सत्ता तुम्हाला सुरक्षित ठेवू शकत नाही. आयुष्य खूप लहान आणि विचित्र आहे, त्यामुळे स्वतःशी खोटं न बोलता मोकळेपणाने जगा. अशाप्रकारे विशालने त्याचं स्पष्ट मत मांडलं आहे. याशिवाय भविष्यात माझाही असा निर्णय आहे, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
जानेवारी २०२६ मध्ये अरिजीत सिंहने अचानक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केले होते की, तो आता इथून पुढे कोणतीही नवीन फिल्म किंवा प्लेबॅक असाइनमेंट स्वीकारणार नाही. त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानत हा प्रवास संपवत असल्याचे म्हटले होते. विशाल ददलानीच्या या विधानानंतर आता संगीत क्षेत्रात एका नव्या चर्चेला उधाण आले आहे की, विशाल ददलानी देखील लवकरच पार्श्वगायनातून निवृत्ती घेणार का? अर्थात याचं उत्तर आगामी काळात कळेलच.
Web Summary : Following Arijit Singh's retirement announcement, Vishal Dadlani supports his decision and indicates he might follow suit. He emphasizes prioritizing personal well-being and doing work with joy, sparking speculation about his future plans in music.
Web Summary : अरिजीत सिंह की घोषणा के बाद, विशाल ददलानी ने उनके फैसले का समर्थन किया और संकेत दिया कि वह भी ऐसा कर सकते हैं। उन्होंने व्यक्तिगत कल्याण को प्राथमिकता देने और खुशी के साथ काम करने पर जोर दिया, जिससे संगीत में उनकी भविष्य की योजनाओं के बारे में अटकलें लगाई जा रही हैं।