Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ची हवा, आता ओटीटीवर कधी अन् कुठे पाहता येणार? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:07 IST

'धुरंधर २' ने रान पेटवलंय! एकीकडे बॉक्स ऑफिस गाजवत असताना OTTवर कधी अन् कुठे बघाल? जाणून घ्या... 

Dhurandhar 2 OTT release: मागील काही दिवसांपासून हिंदी सिनेविश्वात आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर-२ सिनेमाची बरीच चर्चा होती. अखेर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.त्यानंतर अवघ्या तीन महिन्यातंच चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या शोपासून प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.रणवीर सिंगच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आता काही सिनेमाप्रेमी हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल याच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच काल १९ मार्च २०२६ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तांत्रिक अडचणींमुळे देशभरातील काही शो रद्द होऊनही धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत.प्रदर्शनाच्या पहिल्याच  या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.आत्तापर्यंत या सिनेमाने १०२.५५ कोटी कमावले आहेत. शिवाय आदित्य धर यांचा हा सिनेमा २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. 

'धुरंधर २' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार...

दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. त्यामुळे आता या चित्रपटाचा सीक्वेलही नेटफ्लिक्सवर येणार असा अनेकांचा समज होता. मात्र, धुरंधर २ हा सिनेमा जिओ हॉटस्टार रिलीज करण्यात येणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या सीक्वेलचे डिजिटल राइट्स तब्बल १५० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ही एक सगळ्यात मोठी ओटीटी डील मानली जात आहे.

दरम्यान, धुरंधर-२ च्या  ओटीटी प्रदर्शनाबाबत निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, साधारण एखादा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातो. याचा अर्थ रणवीरचा हा सिनेमा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत  ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Box Office Success: OTT Release Date & Platform

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' is a box office hit. Digital rights acquired by Jio Hotstar for ₹150 crore. Expected OTT release in June.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा