Join us

वयाने ३७ वर्ष मोठ्या अभिनेत्याची आई बनली 'ही' अभिनेत्री; म्हणाली, "माझं करिअर संपेल असा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:47 IST

सिनेमाला नंतर अनेक अवॉर्ड्स मिळाले. आजही या सिनेमाचं नाव सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये घेतलं जातं.

मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी जास्त वयाच्या अभिनेत्यांसोबत रोमान्स केल आहे. पण अशी एक अभिनेत्री आहे जिने चक्क ३७ वर्ष मोठ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारली आहे. ही भूमिका करताना तिला अनेकांनी पुन्हा विचार कर असा सल्ला दिला होता. मात्र तिने सिनेमाला होकार दिला. नंतर हा सिनेमा तुफान गाजला. अभिनेत्रीचंही खूप कौतुक झालं. कोणता आहे तो सिनेमा?

२०१२ साली आलेला 'पा' सिनेमा आठवतोय? यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रोजेरिया या दुर्मिळ आजारग्रस्त मुलाची भूमिका साकारली होती. त्यांना तशा पद्धतीचा मेकअप करण्यात आला होता. पा मध्ये त्यांचं नाव ऑरो होतं. ते बिग बी आहेत हे ओळखणंही कठीण होतं. सिनेमात त्यांच्या आईच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री आहे विद्या बालन (Vidya Balan). विद्याने ही भूमिका करुन सर्वांना आश्चर्यचकितच केलं होतं. सिनेमा रिलीज होऊन १५ वर्ष झाली आहेत. तर विद्या बालननेही इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण केली आहेत. 

'पा'ची ऑफर आली तेव्हा विद्या म्हणाली, "मला वाटलं आर बाल्की वेडे झाले आहेत. मला आणि अभिषेकला ते अमिताभ बच्चन यांच्या आईवडिलांच्या भूमिकेत कसे कास्ट करु शकतात. मला विचित्रच वाटलं होतं. पण जेव्हा मी पूर्ण स्क्रिप्ट ऐकली तेव्हा माझे विचार बदलले. मला मनातून असा विचार आला की हे तर केलंच पाहिजे."

ती पुढे म्हणाली, "मला अनेकांनी इशारा दिला होता की ही भूमिका केल्याने माझं करिअर संपू शकतं. पण मी माझ्या एका लेखक मित्राशी आणि अॅड फिल्ममेकरशी चर्चा केली. त्यांनी मला ही भूमिका स्वीकारण्याचा सल्ला दिला.  मग मी इतर लोकांचं ऐकणं सोडून दिलं आणि होकार दिला. मी याआधीही अनेक असे सिनेमे केले होते जे करण्यात मला अजिबात मजा आली नाही. मला तेच पुन्हा करायचं नव्हतं."

'पा' सिनेमानंतर विद्या बालनसोबतच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं. सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्म चा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूड