Join us
Daily Top 2Weekly Top 5

काजोलची आई अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, दोन दिवस आयसीयूत घेतले उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 15:25 IST

तनुजा यांची वयोमानामुळे होणाऱ्या शारिरीक समस्यांमुळे तब्येत बिघडली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांना दोन दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. तनुजा यांची तब्येत बिघडल्याचं कळताच चाहते चिंतेत होते आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. आता त्या सुखरुप घरी पोहचल्या असल्याची माहिती समोर आली आहे. 

तनुजा यांची वयोमानामुळे होणाऱ्या शारिरीक समस्यांमुळे तब्येत बिघडली होती. रविवारी त्यांना अॅडमिट करण्यात आले होते. ही माहिती मिळताच चाहत्यांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ दे अशी प्रार्थना केली. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, 'काल रात्री उशिरा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे.' चाहत्यांनाही आता हे ऐकून आनंद झाला आहे. 

तनुजा यांनी १६ व्या वर्षी अगदी कमी वयात इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. चाईल्ड आर्टिस्ट म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. 'हमारी बेटी' मधून त्यांनी पदार्पण केलं. कुमारसेन समर्थ आणि शोभा समर्थ यांच्या त्या मुलगी आहेत. करिअर सुरळीत सुरु असतानाच त्यांनी शोमू मुखर्जी यांच्याशी विवाह केला. तनुजा यांना काजोल आणि तनिषा मुखर्जी या दोन मुली आहेत. काजोलहीबॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

टॅग्स :काजोलपरिवारहॉस्पिटलबॉलिवूड