Sharvari Wagh Post: हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक अशी ओळख असणारे सूरज बडजात्या आणखी एका नवीन कथा घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत.‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटाद्वारे राजश्रीचे लाडके पात्र ‘प्रेम’ १२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत येत आहे. चित्रपटात आयुष्मान खुराना पहिल्यांदाच प्रेमची भूमिका साकारत असून, त्याच्यासोबत शर्वरी वाघ देखील प्रमुख भूमिकेत आहे.या चित्रपटाची निर्मिती राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.
‘ये प्रेम मोल लिया’ या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर, बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी हिने इंस्टाग्रामवर एक खास नोट शेअर करत या प्रोजेक्टमधील अनुभवाबद्दल सांगितलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर करत शर्वरीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर आपले विचार मांडताना शर्वरी म्हणाली, “'ये प्रेम मोल लिया'चा प्रवास, एक खूप खूप खास चित्रपट, कृतज्ञता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि सुंदर अनुभवांनी भरलेला राहिला आहे.
सूरज बडजात्यांसोबतचा काम करण्याचा अनुभव कसा होता?
या पोस्टमध्ये शर्वरीने सूरज बडजात्या यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत म्हणाली,"सूरज सरांसोबत काम करणे म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. आणि हा प्रवास आयुष्मान सोबत शेअर करणं याला आणखी खास बनवत आहे. २७ नोव्हेंबर २०२ रोजी तुम्हा सर्वांना थिएटरमध्ये हा चित्रपट अनुभवताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे! ”
हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्या यांनी केलं आहे. मोठ्या पडद्यावरील कौटुंबिक मनोरंजनपट म्हणून सादर होत असलेला हा चित्रपट नव्या जोडीला एकत्र आणतो आणि प्रेक्षकांशी भावनिक व सांस्कृतिक पद्धतीने जोडला जाणार आहे.राजश्री प्रॉडकशन्स आणि महावीर जैन फिल्म्स यांच्या सहकार्याने तयार झालेला हा चित्रपट शर्वरीच्या करिअरसाठी महत्वाचा प्रोजेट ठरणार आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे.
Web Summary : Sharvari Wagh expresses joy starring in Sooraj Barjatya's 'Ye Prem Mol Liya' alongside Ayushmann Khurrana. The film releases November 27, 2026.
Web Summary : शर्वरी वाघ आयुष्मान खुराना के साथ सूरज बड़जात्या की 'ये प्रेम मोल लिया' में अभिनय कर खुश हैं। फिल्म 27 नवंबर, 2026 को रिलीज होगी।