मराठमोळी राधिका आपटे (Radhika Apte) बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्येही सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वीच ती आईही झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर काही आठवड्यातच राधिका पुन्हा कामावर परतली. आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित करणारी राधिका आपटे आता दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे. 'कोट्या' या सिनेमाचं ती दिग्दर्शन करणार आहे. हा एक अॅक्शन-फँटसी सिनेमा असणार आहे.
राधिका आपटेच्या दिग्दर्शन पदार्पणाची घोषणा सिने व्ही सीएचडी मार्केट लाईनअपमध्ये झाली. 'कोट्या' हा हिंदी/मराठी अॅक्शन-फँटसी सिनेमा असणार आहे. उसतोड तरुणाची कथा यामध्ये दाखवण्यात येणार आहे. बळजबरी केलेल्या एका वैद्यकीय प्रक्रियेनंतर त्याला काही शक्ती मिळतात. यानंतर तो या शक्तीचा उपयोग कुटुंबावरील कर्ज उतरवण्यासाठी करतो. विक्रमादित्य मोटवानी सिनेमाची निर्मिती करत आहेत.
राधिकाने २००९ साली 'घो मला असा हवा' या मराठी सिनेमात काम केलं होतं. नंतर तिने 'पॅडमॅन', 'मांझी', 'अंधाधुन', 'विक्रम वेधा', 'कबाली', 'पार्च्ड', 'हंटर', 'लस्ट स्टोरीज' या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. 'सिस्टर मिडनाईट' या हॉलिवूड सिनेमात ती शेवटची दिसली. हा सिनेमा बाफ्टा साठी नॉमिनेट झाला होता. तसंच कान्समध्येही या सिनेमाचं प्रीमिअर पार पडलं होतं.
राधिकाने २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. बेनेडिक्ट हा ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. लग्नानंतर आता १२ वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत. त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.