विधू विनोद चोप्रा यांच्या '१२वी फेल' सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात विक्रांत मेस्सीने मुख्य भूमिका साकारली. त्याच्या कामाच जगभरात कौतुक झालं. विक्रांतचा परफॉर्मन्स सर्वांनाच आवडला. शिवाय त्याला अभिनेत्री मेधा शंकरनेही उत्तम साथ दिली. तिचाही निरागस अभिनय वाखणण्याजोगा होता. '१२वी फेल' च्या यशानंतर आता मेधा शंकर पुन्हा कोणत्या सिनेमात दिसणार माहितीये का?
अभिनेत्री मेधा शंकर (Medha Shankar) आता जासूसी कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता सनी कौशल (Sunny Kaushal) आणि निम्रत कौर असणार आहेत. सिनेमाचं शूट सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. अद्याप सिनेमाचं टायटल ठरलेलं नाही. लक्ष्मण उतेकर आणि टीसीरिज सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सिनेमातून सनी, मेधा आणि निम्रत पहिल्यांदाच एकत्र येत आहे. मेधाला पुन्हा वेगळ्या भूमिकेत पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
सनी कौशल नुकताच 'फिर आयी हसीन दिलरुबा' सिनेमात दिसला. त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सीसोबत त्याचीही महत्वाची भूमिा होती. तर निम्रत कौर 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' मध्ये दिसली होती. आता ती आगामी 'सेक्शन ८४' मध्येही झळकणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय ती अक्षय कुमार, वीर पहाडिया आणि सारा अली खान यांच्यासोबत 'स्काय फोर्स' मध्ये दिसणार आहे.