१९९७ साली आलेला 'बॉर्डर' (Border) सिनेमा आजही अनेकांना भावुक करतो. यातील दृश्य, गाणी डोळ्यात पाणी आणणारी आहेत. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ या अभिनेत्यांनी सिनेमात भूमिका साकारली. आता ३० वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल येणार आहे. 'बॉर्डर २' (Border 2) मध्येही सनी देओलची (Sunny Deol) भूमिका आहे. तसंच वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ हे देखील आहेत. तर सिनेमात वरुण धवन (Varun Dhawan) अपोजिट मुख्य अभिनेत्री कोण हेही आता समोर आलं आहे.
'बॉर्डर २'च्या मेकर्सकडून अभिनेत्रीची घोषणा करण्यात आली आहे. जी वरुण धवनच्या अपोझिट फीमेल लीड आहे. तिचं नाव मेधा राणा (Medha Rana). या सिनेमातून मेधा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मेधाने याआधी 'इश्क इन द एयर','फ्रायडे नाइट प्लॅन' आणि 'लंडन फाइल्स' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने मेधावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वरुण धवननेही मेधाचा फोटो शेअर करत 'मूव्हीज मध्ये तुझं स्वागत आहे' असं कॅप्शन लिहिलं आहे.
'बॉर्डर २' पुढील वर्षी जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहे. २३ जानेवारी अशी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अहान शेट्टी आणि वरु धवनने काही दिवसांपूर्वी पुण्यातील शेड्युल संपवल्याची झलक दाखवली होती. अहान शेट्टीने सेटवरुन काही फोटोही शेअर केले होते. तर आता नुकतंच अभिनेता दिलजीत दोसांझचं शूट पूर्ण झालं आहे.