Kick 2 Movie: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान हा कायम त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी तो एक आहे. कोणतीही भूमिका असो तो आपल्या दमदार अभिनयाने त्या भूमिकेला योग्य न्याय देतो. सलमानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले. त्यातीलच एक नाव म्हणजे किक सिनेमा. ‘किक’ चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि रणदीप हुडा यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१४ साली आला होता. लवकरच या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वी 'किक-२' संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेल्या किक’ने बॉक्स ऑफिसवर ‘कमाईचे अनेक विक्रम केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला यांनी केलं होतं. अलिकडेच बिग बॉस १९ च्या अंतिम पर्वात सलमानने या चित्रपटाच्या सीक्वलबद्दल हिंट दिली होती. त्यानंतर या चित्रपटाबद्दलच्या चर्चा आता तीव्र झाल्या आहेत.
किक सिनेमातील सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. शिवाय त्यातील गाणी, डायलॉग्जची सु्द्धा क्रेझ निर्माण झाली होती. या चित्रपटानंतर जॅकलिन फर्नांडिसचं नशीब चमकलं.मात्र, किक सिनेमाच्या सीक्वलमधून जॅकलिन फर्नांडिसचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळते आहे. मिडिया रिपोर्टनुसार, किक-२ मध्ये जॅकलिनला रिप्लेस करत अभिनेत्री क्रिती सनॉन सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. वृत्तांनुसार, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला त्याच्या आगामी चित्रपटात सलमान खानसह क्रिती सॅनॉनला कास्ट करण्याचा विचार करत आहेत.
दरम्यान, याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या सलमान खान त्याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्स्त आहे. या चित्रपटानंतर तो 'किक-२' चं शूटिंग सुरु करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Web Summary : Jacqueline Fernandez may be replaced by Kriti Sanon in 'Kick 2' alongside Salman Khan. While unconfirmed, this sequel to the hit film is generating buzz.
Web Summary : 'किक 2' में जैकलीन फर्नांडीज की जगह कृति सैनन सलमान खान के साथ दिख सकती हैं। हालांकि इसकी पुष्टि नहीं हुई है, लेकिन हिट फिल्म का यह सीक्वल चर्चा में है।