Join us
Daily Top 2Weekly Top 5

Childhood Photo: आईची साडी नेसून पोझ देणाऱ्या या क्युट मुलीला ओळखलंत का?, चारवेळा पटकावलाय राष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 10:32 IST

बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात येतात. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

बॉलिवूड स्टार्सचे फोटो अनेकदा डिजिटल जगात व्हायरल होतात, मात्र त्यांच्या लहानपणीच्या फोटोंना सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. बी-टाउन सेलेब्स अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर करून प्रसिद्धी झोतात येतात, जे त्यांचे चाहते मोठ्या उत्साहाने पाहतात. आता आणखी एका बॉलिवूड सेलिब्रिटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. हा फोटो पाहून त्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला ओळखणे अवघडच नाही तर अशक्य आहे. मग अंदाज करा ही अभिनेत्री कोण आहे? काय झालं... कळत नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही अभिनेत्री  तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. चार नॅशनल अवार्ड जिंकणारी अभिनेत्र सामाजिक व राजकीय मुद्यावर बोलते. 

कदाचित आत्तापर्यंत तुम्हाला कळले असेल की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. होय... ही कंगना राणौत. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर तिचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे.या फोटोमध्ये कंगना डान्स पोझ देताना दिसत आहे.

फोटो पोस्ट करताना अभिनेत्रीने लिहिले की, ' मी 10 किंवा 11 वर्षांची असताना माझ्या आईची साडी नेसली होती आणि लिपस्टिक लावली होती. बहीण रांगोलीचा बँड चोरुन घातला होता आणि शास्त्रीय डान्सरसारखा अभिनय केला.. हा हा.' बालपणीच्या या फोटोमध्ये कंगना खूपच क्यूट दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना रणौतने काही काळापूर्वी तिच्या इमर्जन्सी चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा राजकीय-नाटक चित्रपट आहे. या चित्रपटात १९७५ मधील आणीबाणीची कथा सांगितली जाणार असल्याचे नावावरून स्पष्ट होते. आणीबाणीत कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड