Actress Jyotika : तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी व सौंदर्याची देणगी लाभलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ज्योतिका सरवणन. तीन फिल्मफेअर पुरस्कार, तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, तमिळ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारांसह तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने १९९८ साली 'डोली सजा के रखना'या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे आपला मोर्चा वळवला. सध्याच्या घडीला ती दक्षिणेकडील सगळ्याच यशस्वी अभिनेत्री आहे.
सध्या जोतिका 'System' या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यानिमित्ताने मुंबई सोडून चेन्नईला जाण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. तसंच २६ वर्षानंतर मुंबईत परण्याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही, त्यानंतरच मी तामिळ चित्रपटसृष्टीकडे वळले. पण माझा असा विश्वास आहे की, तो चित्रपट खरंच चांगला होता. त्यानंतर जे घडलं ते चांगलंच घडलं."
या दरम्यान, अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीतील सर्वात सशक्त भूमिका तमिळ चित्रपटसृष्टीत साकारला मिळाल्या, असं वक्तव्य केलं. जोतिका म्हणाली, मला चेन्नई खूप आवडते. हे एक पारंपरिक शहर आहे. याच शहराने मला ओळख दिली, मला माझं कुटुंब दिलं आणि कामही दिलं. मी चित्रपटांमध्ये मूक-बधिर व्यक्तीच्या भूमिका साकारल्या, तसेच अंध व्यक्तीचीही भूमिका साकारली आहे.मला ज्या भूमिका करायच्या होत्या त्या सर्व भूमिका इथे आल्यानंतर साकारल्या आहेत; त्यामुळे ही माझ्यासाठी ईश्वराचीच एक देणगीच आहे."
अभिनेत्री ज्योतिका जवळपास २६ वर्षानंतर मुंबईत परतली आहे. आता हिंदी सिनेसृष्टीत तिला पाहिजे तशा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारायला मिळत आहेत. तिने सांगितलं, "आता हिंदीत मला विविध प्रकारच्या भूमिका मिळत आहेत.दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील माझ्या कामामुळेच इकडेही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हे सगळं एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. मला यात असा काही विशेष फरक जाणवत नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं महत्त्वाचं आहे," असं तिने सांगितलं.
मुंबईपासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्रीला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आठवण यायची, याबद्दल विचारलं असता जोतिकाने मनमोकळेपणाने उत्तर दिलं. ती म्हणाली, मला मुंबई खूप आवडते. मी इथेच लहानाची मोठी झाले. माझा जन्म इथेच झाला. शिवाय शालेय शिक्षणही इथेच झालं.अगदी माझ्या शाळेसमोरून रस्ता ओलांडतानाही मनात जुन्या आठवणी दाटून येतात. मला मुंबईतील प्रत्येक गोष्ट आवडते. अगदी पाणीपुरी, भेळपुरी, अगदी हिंदी बोलणंही...,अशा प्रत्येक गोष्टीची मला खूप आठवण यायची."
Web Summary : Jyothika, who debuted with Akshay Khanna, found success in South Indian cinema after her Bollywood film failed. Now, returning after 26 years, she appreciates diverse roles and fondly remembers Mumbai.
Web Summary : अक्षय खन्ना के साथ शुरुआत करने वाली ज्योतिका को बॉलीवुड फिल्म के विफल होने के बाद दक्षिण भारतीय सिनेमा में सफलता मिली। 26 साल बाद वापसी करते हुए, वह विविध भूमिकाओं की सराहना करती हैं और मुंबई को याद करती हैं।