Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरती छाब्रियाने महिनाभरापूर्वीच दिला मुलाला जन्म, का लपवली गुडन्यूज? सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 10:07 IST

41व्या वर्षी आरती बाळाला जन्म देणार असल्याने खूप चर्चा झाली. पण आरतीने महिन्याभरापूर्वीच बाळाला जन्म दिला असल्याचं आता समोर आलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आरती छाब्रिया (Aarti Chabria) बिग स्क्रीनवरुन एकाएकी गायबच झाली.2019 साली तिने गुपचूप लग्न केले आणि ती परदेशात स्थायिक झाली. काही दिवसांपूर्वीच 41 वर्षीय आरतीन प्रेग्नंट असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. वयाच्या 41 व्या वर्षी आरती बाळाला जन्म देणार असल्याने खूप चर्चा झाली. पण आरतीने महिन्याभरापूर्वीच बाळाला जन्म दिला असल्याचं आता समोर आलं आहे. ४ मार्च रोजीच तिने गोंडस मुलाला जन्म दिला. पण मग तिने ही बातमी का लपवली असा प्रश्न सर्वांना पडला असेल. आता तिनेच याचं उत्तर दिलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आरती छाब्रिया म्हणाली, "माझा मुलगा युवानच्या जन्माअगोदरच माझं एक मिसकॅरेज झालं होतं. याच कारणाने मी दुसऱ्या प्रेग्नंसीविषयी कोणालाच सांगितलं नाही. पण मला यात काहीच गैर वाटत नाही कारण ही सामान्य गोष्ट आहे. शेवटी मीही एक माणूस आहे. लोकांना वाटतं की ही तर अभिनेत्री आहे, हिच्यासाठी सगळं सोपं आहे, पैसे देऊन होऊन जाईल. पण असं नसतं. याचा शरीरावर परिणाम होतो. मला डबल चिन आली होती. माझं शरीर अवाढव्य वाढत होतं. गोळ्यांचा माझ्यावर चुकीचा परिणाम होत होता. मी याचा सामना करु शकले नाही. मी एक cycle नंतर करु शकत नव्हते खूप थकले होते. ४१ व्या वर्षी बाळाला जन्म देणं २०-३० वर्षाइतकं सोपं नाही."

ती पुढे म्हणाली, "पहिल्या मिसकॅरेजनंतर मी खूप तणावात होते. त्यामुळे मी पुन्हा कंसिव्ह करु शकत नव्हते. पण जेव्हा मी हार मानली तणावमुक्त झाले तेव्हा माझी प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली. हा माझ्यासाठी आणि माझ्या पतीसाठी सर्वात सुंदर क्षण होता."

आरती छाब्रियाने 23 जून 2019 रोजी विशारद बिडासीसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने 5 वर्षांनी मुलाला जन्म दिला. आरतीने 'आवारा पागल दिवाना', 'तुमसे अच्छा कौन है','हे बेबी' सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं. 

टॅग्स :आरती छाबरियाबॉलिवूडप्रेग्नंसी