Join us
Daily Top 2Weekly Top 5

'12th Fail' नंतर अभिनेता विक्रांत मेसी कधी आणि कोणत्या चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:58 IST

विक्रांत लवकरच एका सस्पेन्स-कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसीला विधू विनोद चोप्रा यांच्या '12th फेल' चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रेक्षक-समीक्षकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. मालिकांमध्ये काम करत करत मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलेल्या विक्रांतच्या नव्या सिनेमाविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक झाले आहेत. विक्रांत लवकरच एका सस्पेन्स-कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

विक्रांत मेसीच्या आगामी हिंदी सिनेमाचं नाव आहे 'ब्लॅकआऊट'. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. काही दिवसांपुर्वीच 'ब्लॅकआऊट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता.  ट्रेलरमध्ये विक्रांतचा अभिनय पाहिल्यानंतर चाहते सिनेमाची वाट पाहत आहेत. उद्या अर्थात ७ जूनला जिओ सिनेमावर हा रिलीज होणार आहे.  हा चित्रपट प्रेक्षकांना जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर पाहता येणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं घरबसल्या भरभरून मनोरंजन होणार आहे.

नाटक, मालिकांपासून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या विक्रांतने अथक मेहनत, चिकाटी आणि प्रयत्न यांच्या जोरावर त्याच्या करिअरचा आलेख उंचावत नेला आहे. विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट' या सिनेमात मराठी अभिनेता प्रसाद ओक एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रसाद ओकसोबतच मौनी रॉय, विक्रांत मेस्सी, करण सोनावणे, सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसत आहेत. त्यामुळे आता त्याचा हा विक्रांतचा हा नवा कोरा बॉलिवूडपट पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. 

टॅग्स :विक्रांत मेसीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाजिओ