बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव त्याच्या अभिनयासोबतच नवनवीन लूकसाठी ओळखला जातो. मात्र, अलीकडेच एका कार्यक्रमात राजकुमार अशा अवतारात दिसला की, त्याला ओळखणेही चाहत्यांना कठीण झाले आहे. एका कार्यक्रमातील त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्याच्या या बदललेल्या लूकमुळे चाहते चांगलेच थक्क झाले आहेत
राजकुमार रावचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
मुंबईत आयोजित एका शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजकुमार रावने हजेरी लावली होती. यावेळी त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मात्र, सर्वांचे लक्ष राजकुमारच्या बदलत्या लूककडे वेधले. राजकुमारचा चेहरा काहीसा सुजलेला दिसत होता, तसेच त्याने दाढी आणि मिशाही वाढवल्या होत्या. त्याचे केसही नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलमध्ये होते. या व्हिडिओत त्याचे वजनही काहीसे वाढलेले जाणवत आहे. काय 'फिट अँड फाईन' आणि 'अप टू डेट' असणाऱ्या राजकुमारला अशा अवतारात बघून सर्वांना आश्चर्य वाटलं.
सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी हा लूक?
राजकुमारचा हा बदललेला अवतार पाहून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अनेक चाहत्यांच्या मते, राजकुमारने हा लूक भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या बायोपिकसाठी केला असावा, अशी चर्चा आहे. गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे चित्रीकरण मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे भूमिकेची गरज म्हणून त्याने वजन वाढवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही चाहत्यांनी राजकुमारच्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. राजकुमार रावने अद्याप स्वतःच्या या बदललेल्या लूकवर स्वतःहून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, तो नेहमीच आपल्या भूमिकेसाठी स्वतःला झोकून देतो, हे पाहता हा त्याच्या पुढच्या चित्रपटाचा 'मास्टर लूक' असू शकतो, अशी चिन्हे दिसत आहेत.
Web Summary : Rajkummar Rao's recent appearance with noticeable weight gain, a beard, and glasses, has surprised fans. Speculation suggests it's for a role, possibly in Sourav Ganguly's biopic, though Rao hasn't confirmed it. His commitment to roles is well-known.
Web Summary : राजकुमार राव का वजन बढ़ने, दाढ़ी और चश्मे के साथ हालिया दिखावा देखकर प्रशंसक हैरान हैं। अटकलें हैं कि यह किसी भूमिका के लिए है, संभवतः सौरव गांगुली की बायोपिक में, हालांकि राव ने इसकी पुष्टि नहीं की है। भूमिकाओं के प्रति उनकी प्रतिबद्धता जगजाहिर है।