Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता कार्तिक आर्यनने हाती घेतली बंदुक; कोणतं युद्ध लढायला निघाला, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 21:44 IST

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आहे.

Kartik Aryan: नेहमी हसरा चेहरा आणि आपल्या डॅशिंग लुक्ससाठी ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यानंतर आता कार्तिक त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक अॅक्शनपट असून, कार्तिकने चित्रपटातील एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

8 मिनिटांचा सिंगल-टेक वॉर सीनकार्तिकने 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी 8 मिनिटांचा सिंगल-टेक वॉर सीन शूट केला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे कार्तिकने सांगितले की, त्याने हा 8 मिनिटांचा वॉर सीन सिंगल टेकमध्ये शूट केला आहे. हा त्याच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात खास आणि संस्मरणीय शॉट होता. पोस्ट शेअर करत त्याने पुढे लिहिले की, हा 8 मिनिटांचा सिंगल टेक वॉर सीन माझ्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि कठीण सीन होता. या पोस्टमध्ये कार्तिकने दिग्दर्शक कबीर खानचेही आभार मानले आहेत.

'चंदू चॅम्पियन' कधी प्रदर्शित होणार?‘चंदू चॅम्पियन’ हा कार्तिक आर्यन आणि कबीर खान यांचा एकत्र पहिला चित्रपट असेल. साजिद नाडियादवाला याचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा एका खेळाडूच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडयुद्धकबीर खान