Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता आशिष पाथोडेने शेअर केला 'छावा'च्या सेटवरील व्हिडीओ, म्हणाला - "माझ्या शूटिंगचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:26 IST

Ashish Pathode : अभिनेता आशिष पाथोडे याने इंस्टाग्रामवर छावा सिनेमाच्या शूटिंगच्या सेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

यावर्षातला दमदार सिनेमा म्हणून विकी कौशल(Vicky Kaushal)च्या छावा सिनेमा(Chhaava Movie)ने छाप सोडली आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन करुन या चित्रपटाने यशाचा नवीन अध्याय लिहिला आहे. तिसऱ्या आठवड्यातही छावा सिनेमाने चांगले कलेक्शन केले आहे. Sacknilk च्यानुसार, छावाने १८व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास ९ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील कलाकार शूटिंगचे किस्से आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान या चित्रपटात अभिनेता आशिष पाथोडे(Ashish Pathode)ने अंताजी यांची भूमिका साकारली होती. त्याने आता छावाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

अभिनेता आशिष पाथोडे याने इंस्टाग्रामवर छावा सिनेमाच्या शूटिंगच्या सेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिले की, हा व्हिडीओ माझा छावाच्या शूटवेळेच्या शेवटच्या दिवसाचा आहे. सेटवरील प्रत्येक जण अंताजी पात्रावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. लक्ष्मण उतेकर सर माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. सर्व गोष्टींसाठी आभारी आहे. राजे म्हणजेच विकी कौशल आणि विनीत भाई मस्तीच्या मोडमध्ये दिसत आहेत.

'छावा' चित्रपटात विकी कौशलसोबतरश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. रश्मिकाने चित्रपटात महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात बरेच मराठी कलाकार आहेत. छावा चित्रपटाने तिसऱ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार छावाने २४.२५ कोटींचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत या सिनेमाने ४५८.७५ कोटींची कमाई केली आहे.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशल