सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमानचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सलमानची सर्वांना आदरयुक्त भीती वाटते. याचा अनुभव नुकताच आला. सलमान एका सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी तिथे अली फझल आणि रिचा चढ्ढाही उपस्थित होते. दोघेही पापाराझींसोबत फोटोशूट करण्यात मग्न होते. अचानक त्यांना लांबूनच सलमान येताना दिसला. पुढे काय घडलं?रिचा आणि अलीसोबत काय घडलं?
Variety नावाच्या एका प्रोजक्टमध्ये रिचा आणि अली हे सेलिब्रिटी जोडपं सहभागी होतं. यावेळी दोघेही एकमेकांचा हात हातात धरुन रेड कार्पेटवर आले. ते दोघेही पापाराझींसमोर फोटोशूट करत होते. अशातच अली आणि रिचाला दुरुनच सलमान खान येताना दिसला. त्यामुळे त्यांनी तिथून दूर निघून जाणं पसंत केलं. अलीने ''भाई येतोय, भाई येतोय...,'' अशी सुचना पापाराझींना केली. पुढे सलमानची त्याच्या स्वॅगमध्ये एन्ट्री झाली. अलीने दुरुनच सलमानला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला.
Web Summary : At an event, Ali Fazal and Richa Chadha quickly moved away upon spotting Salman Khan, with Ali humorously alerting paparazzi that "bhai" was arriving. The video went viral, showing Salman's influence.
Web Summary : एक कार्यक्रम में, सलमान खान को देखते ही अली फज़ल और ऋचा चड्ढा तुरंत दूर हट गए, अली ने मजाकिया अंदाज में पैपराज़ी को सतर्क करते हुए कहा कि "भाई" आ रहे हैं। यह वीडियो वायरल हो गया, जिससे सलमान का प्रभाव दिखा।