Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:05 IST

शाहरुख खानचा लेक अबराम खानच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन झालं. पण शाहरुख लेकाच्या बर्थडेला अनुपस्थित असलेला दिसला. काय आहे कारण?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबराम खानने २७ मे रोजी आपला १२वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी शाहरुख खान आणि त्यांचा मोठा मुलगा आर्यन खान अनुपस्थित होते. मात्र गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांनी अबरामसाठी एक खास पार्टीचे आयोजन केले.ही पार्टी मुंबईतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) आर्ट्स कॅफे येथे आयोजित करण्यात आली होती.

अबरामच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

या खास पार्टीमध्ये शाहरुखची गौरी खान, सुहाना खान, अबरामची नानी, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि काही जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. सुहाना खान आणि गौरी खान यावेळी स्टायलिश अंदाजात दिसल्या. या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अबराम त्याची बहीण सुहानाचा हात धरून पार्टीच्या ठिकाणी येताना दिसतो. या व्हिडिओमध्ये पार्टीसाठी खायला ठेवलेले पिझ्झा, चॉकलेट केक आणि इतर गोड पदार्थांची झलक पाहायला मिळते. या व्हिडिओला NMACC च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आले आहे.

किंग खान गैरहजर का?

शाहरुख खान आणि आर्यन खान या पार्टीमध्ये अनुपस्थित असल्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल सोशल मीडियावर प्रश्न विचारले आहेत. पण यामागचं कारण म्हणजे शाहरुख आणि आर्यन दोघेही बाप-लेक त्यांच्या आगामी Bas***ds of Bollywood या सिनेमाच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे दोघेही अबरामच्या वाढदिवसाला येऊ शकले नाहीत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच सेलिब्रिटींनी आणि शाहरुखच्या चाहत्यांनी अबरामला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :अबराम खानशाहरुख खानगौरी खानसुहाना खानआर्यन खानबॉलिवूड