Join us

"बोलण्यासाठी खूप काही आहे पण...", अभिषेक बच्चनने शेअर केली नवी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:32 IST

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन चर्चेत आहे.

अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. आताही सध्या अभिषेकची चर्चा रंगली आहे. नुकतंच अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. 

अभिषेक बच्चनचा एक नवा सिनेमा येतोय. I Want To Talk असं अभिषेकच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा पोस्टर फोटो अभिषेकने पोस्ट केलाय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, बोलण्यासाठी खूप काही आहे, पण एक पिक्चर  सगळं सांगून जाईल". सिनेमाच्या या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनच्या पोटावर शस्त्रक्रियेची खूण आहे. या पोस्टरवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अभिषेकचा हा नवा सिनेमा २२ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अभिषेक हा शाहरुख खानच्या किंग चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. याआधी अभिषेक बच्चन 'घूमर' या चित्रपटात दिसला होता.  यामध्ये तो क्रिकेट कोचच्या भूमिकेत होता. 'घूमर' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपटाची कथा चांगली होती, मात्र प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.  

टॅग्स :अभिषेक बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा