Abhishek Bachchan: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील योगदान फार मोठं आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेत मुलगा अभिषेकही चित्रपटसृष्टीत काम करत आहे.त्याच्या अभिनयाचं वेळोवेळी कौतुक होताना दिसतं. सध्या एका मुलाखतीमुळे अभिषेक चर्चेत आला आहे. त्यादरम्यान अभिषेकने बच्चन कुटुंबियांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाविषयी सांगितलं.
१९८२ मध्ये 'कुली' चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती.'कुली' मधील तो अॅक्शन सीक्वेंस करताना नकळतपणे पुनीत इस्सर यांनी त्यांच्या पोटात जोरदार मुक्का मारला होता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी ते बरे होण्याची आशा सोडली होती. तेव्हा जया बच्चन यांनी कसं संपूर्ण कुटुंबाला सांभाळलं. त्या कठीण काळाबद्दल अभिषेकने पिपिंग मुनला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं. तो म्हणाला," त्या रात्री जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्यासोबत बरेच लोक होते, जे त्यांना चालण्यास मदत करत होते. मी त्यांना पाहताच मिठी मारायला गेलो, पण त्यांनी मला बाजुला केलं.मला माहित नव्हतं की त्यांना दुखापत झाली आहे. बाबांनी मला जवळ घेतलं नाही म्हणून मी त्यांच्यावर रागावलो होतो.
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला,"त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही पप्पांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचो तेव्हा आई आणि बाबा काहीचं घडलेलं नाही असं वागायचे.मला तेव्हा कळलं नाही की ती परिस्थिती किती गंभीर होती.जेव्हा आपण रुग्णालयात जातो आणि सहाजिकचं असं वाटू शकतं काहीतरी गडबड आहे. पण, आम्हाला मास्क घालायला आणि डॉक्टर व्हायची उत्सुकता असायची.तेव्हा आम्ही लहानच होतो.आम्हाला काही कळू नये म्हणून बाबा हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जवळ ड्रीप असायचे आणि ते त्याला पतंग म्हणायचे."
त्या काळात कुटुंब कसं सांभाळलं, याचं श्रेय अभिषेक जया बच्चन यांना देतो. तो म्हणाला, "याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं. मी तिला कधीही रडताना किंवा वाईट मूडमध्ये असताना पाहिलं नाही.तिने शक्य तितकं सगळं नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने काय अनुभवलं असेल याची कल्पना करू शकत नाही. अशा परिस्थितीत कुटुंब सांभाळणं खूप कठीण आहे.तेव्हा ती कदाचित ३० किंवा ३५ वर्षांची होती आणि पदरात दोन लहान मुले होती. तो काळ आमच्या कुटुंबासाठी खूपच कठीण होता, पण त्यांनी यामुळे आम्हाला वाईट वाटू नये याची काळजी घेतली."
Web Summary : Abhishek Bachchan recalls the 'Coolie' accident where Amitabh nearly died. He praises Jaya Bachchan for her strength in managing the family during that difficult time and keeping things normal for them.
Web Summary : अभिषेक बच्चन ने 'कुली' हादसे को याद किया जिसमें अमिताभ बाल-बाल बचे थे। उन्होंने जया बच्चन की ताकत की सराहना की, जिन्होंने उस मुश्किल समय में परिवार का प्रबंधन किया।