Join us

'लोकांना वाटतं मला डोकं नाहीये, पण...' इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवर आयुष शर्माने पहिल्यांदाच केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:07 IST

Aayush sharma: इंडस्ट्रीतील लोक त्याच्याविषयी नेमका काय विचार करतात हे त्याने पहिल्यांदाच सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा (salman khan) मेहुणा आयुष शर्मा (ayush sharma) सध्या सातत्याने चर्चेत येत आहे. लवयात्री या सिनेमातूनबॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आयुष लवकरच रूसलान या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्येच त्याचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या स्ट्रगलवर भाष्य केलं.

आयुषने आतापर्यंत खान प्रोडक्शनअंतर्गत काम केलं आहे. मात्र, पहिल्यांदाच तो 'रुसलान'च्या निमित्ताने एका वेगळ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करत आहे. त्यामुळे तो चर्चेत येत आहे. यामध्येच त्याने त्याच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांच्या मनात त्याच्याविषयी कोणती इमेज तयार झालेली हे सांगितलं आहे.

"बऱ्याचदा मला कास्ट करण्यापूर्वी काही फिल्ममेकर कन्फ्युज असतात. त्यांना असं वाटतं की मला त्यांच्या सिनेमात घेतलं तर खान परिवार त्यांच्या कामात हस्तक्षेप करेल. त्यामुळे मला तोंडावर नाही सांगण्यापेक्षा काही चित्रपट निर्माते मला त्यांच्या सिनेमात घेण्याचंच टाळतात. इंडस्ट्रीतील काही लोकांना वाटतं मला डोकं नाहीये. आणि, माझ्याशी संबंधित सगळे निर्णय खान परिवार घेतं. पण, ते (खान परिवार) माझ्यावर प्रेम करतात. मात्र, माझे निर्णय मीच घेतो. माझं सगळं चांगलं व्हावं हाच त्यांचा हेतू असतो. वास्तविक पाहता मी इंडस्ट्रीला फारसं ओळखत नाही त्यामुळे मी या इंडस्ट्रीला सुरक्षित मानायचो", असं आयुष म्हणाला.

दरम्यान, आयुषने इंडस्ट्रीत पदार्पण करुन आता ६ वर्ष झाली आहेत. या ६ वर्षात त्याने तीन सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. यामध्येच त्याचा रुसलान हा सिनेमा २६ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण भुतानी यांनी केलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडआयुष शर्मासलमान खानसिनेमासेलिब्रिटी