Join us

Aamir Khan:'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:24 IST

आमिर खान महाभारतावर चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. आता पहिल्यांदाच आमिरनेच या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. विविध कार्यक्रमातून आणि मुलाखतीतून चित्रपट पाहण्याचे तो आवाहन करत आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी चित्रपट रिलीज होणार असून, त्याची अक्षय कुमार (Akshay Kumar) च्या 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) सोबत थेट टक्कर आहे. 

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्याने आपला अखेरचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या अपयशावर मोकळेपणाने चर्चा केली. तसेच, त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या महाभारतावरही भाष्य केले. यावेळी त्याने महाभारतावर आधारित चित्रपट बनवण्याची इच्छा असल्याचे सांगितले. पण, हा चित्रपट बनवण्यात त्याला भीती वाटत आहे. 

काय म्हणाला आमिर?मुलाखतीत ड्रीम प्रोजेक्टबाबत बोलताना आमिर म्हणाला की, 'महाभारतावर चित्रपट बनवणे सोपी गोष्ट नाही. हा फक्त चित्रपट नाही, तर एक यज्ञ आहे. महाभारत तुम्हाला निराश करणार नाही, पण तुम्ही महाभारताला निराश करू शकता. यावर चित्रपट बनवण्यात मी कमी पडलो तर काय होईल, याची मला भिती आहे. त्यामुळेच मी यावर चित्रपट बनवण्यासाठी तयार नाही,' अशी स्पष्टोक्ती आमिरने दिली.

कधी सुरू झाली महाभारताची चर्चा

2018 मध्ये आमिर 1000 कोटींच्या बजेटमध्ये महाभारतावर प्रोजेक्ट बनवत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याच वर्षी शाहरुख खानने एका मुलाखतीत म्हटले होते की, त्याला महाभारतातील कृष्णाची भूमिका करायची आहे. शाहरुख म्हणाला, 'आमिरने महाभारतातील कृष्णाची भूमिका आधीच घेतली असेल तर मी काय करू.' त्या विधानानंतर आमिर महाभारत बनवत असल्याची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, आता आमिरच्या वक्तव्यानंतर या प्रोजेक्टची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची थोडी निराशा नक्कीच होणार आहे.

टॅग्स :आमिर खानलाल सिंग चड्ढारक्षाबंधनमहाभारत