Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! 'या' दिवशी रिलीज होणार आमिर खानचा 'सितारे जमीन पर', ट्रेलर कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:01 IST

'या' सिनेमासोबत थिएटरमध्ये ट्रेलर आऊट होण्याची शक्यता

'लाल सिंह चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खानचं (Aamir Khan) लवकरच कमबॅक होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. त्याच्या या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. जिनिलिया सिनेमात मुख्य अभिनेत्री आहे. तर 'तारे जमीन पर'फेम दर्शिल सफारीही या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. आता नुकतंच सिनेमाच्या रिलीजसंदर्भात आणि ट्रेलरबाबतीत अपडेट समोर आली आहे.

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार,  आरएस प्रसन्न दिग्दर्शित 'सितारे जमीन पर' येत्या २० जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याआधी सिनेमा ३० मे लाच रिलीज करण्याची योजना होती. मात्र २० जून दरम्यान बॉक्सऑफिसवर इतर कोणतेही सिनेमे नसल्याने त्यांना बॉक्स ऑफिसवर मोकळं मैदान मिळणार आहे. यामुळे सिनेमाची कमाईही चांगली होण्याची आशा आहे. 

रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, 'सितारे जमीन पर' चा ट्रेलर अजय देवगणच्या 'रेड २' सिनेमावेळी आऊट करण्याचा मेकर्सचा प्लॅन आहे. जर असं झालं तर १ मे रोजी सिनेमाचा ट्रेलर येण्याची शक्यता आहे. यासोबत रिलीज डेटही आऊट होईलच. अद्याप मेकर्सकडून आणि आमिरकडून यासंदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही.

याशिवाय आमिर खान 'लाहोर १९४७' सिनेमाची निर्मिती करत आहे. या सिनेमात सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. १५ ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे. 

टॅग्स :आमिर खानजेनेलिया डिसूजाबॉलिवूडसिनेमा