Join us

आमिर खानचा मुलगा साकारणार तृतीयपंथियाची भूमिका, जुनैदच्या डेब्यूचीच सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 17:10 IST

जुनैदच्या अचानक बदललेल्या लुकनेही चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) मोठा मुलगा जुनैद खानच्या (Janaid Khan) बॉलिवूड डेब्यूचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. जुनैद खान स्टारकिड असूनही अतिशय साध्या पद्धतीने राहतो. पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करतो. आमिर एका मुलाखतीत मुलाबद्दल भरभरुन बोलला आहे. तसंच जुनैदच्या अचानक बदललेल्या लुकनेही चाहत्यांचं लक्ष वेधलंय. नवीनच मिळालेल्या माहितीनुसार, जुनैद खान तृतीयपंथियाच्या भूमिकेत दिसणार आहे. पण ही भूमिका फिल्मसाठी नाही तर एका थिएटर प्लेसाठी असणार आहे.

जुनैद खान YRF च्या फिल्ममधून  मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. 'महाराज' या सिनेमात त्याची वर्णी लागली आहे. यासाठी अनेक वर्षांपासून त्याची तयारी सुरु आहे. जुनैद ६ वर्षांपासून थिएटर करत आहे आणि अभिनय शिकत आहे. माध्यम रिपोर्टनुसार, या नाटकात वेगवेगळ्या कहाण्या असणार आहेत. त्यातील २ गोष्टींमध्ये जुनैद भूमिका साकारणार आहे. या दोन्ही भूमिका एकमेकांपासून वेगळ्या असणार आहेत. यातीलच एकामध्ये तो ट्रांसवुमनच्या भूमिकेत असणार आहे. 

१५ नोव्हेंबर रोजी पृथ्वी थिएटरमध्ये जुनैदच्या या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. त्याने २०१७ पासूनच थिएटरला सुरुवात केली होती. एकीकडे प्रेक्षक त्याच्या डेब्यू फिल्मसाठी उत्सुक आहेत तोच त्याला दुसरा सिनेमाही मिळाला असून तो साई पल्लवीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडनाटकसिनेमा