Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सितारे जमीन पर'साठी आमिर खानचा मोठा निर्णय, सकाळी 'या' वेळेत पाहता येणार नाही सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:56 IST

आमिरचा 'सितारे जमीन पर' भल्या पहाटे बघायचा असेल तर असं करता येणार नाहीए

आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा रिलीज होत आहे. 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशानंतर ३ वर्षांनी आमिर पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. उद्यापासून (२० जून) सिनेमा देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी आपण पाहिलंच आहे की अनेक बहुप्रतिक्षित सिनेमांचे शो सकाळी ६ पासूनच सुरु होतात. काही सिनेमांचे शो तर रात्रभरही सुरु असतात. मात्र आमिरने 'सितारे जमीन पर'च्या शोबद्दल वेगळा नियम आणला आहे. काय  आहे तो नियम?

आमिरचा 'सितारे जमीन पर' भल्या पहाटे बघायचा असेल तर असं करता येणार नाहीए. तेलुगु १२३ रिपोर्टनुसार आमिरने सिनेमासाठी नियम लागू केला आहे. सकाळी ११ च्या आधी सिनेमाचे शो उपलब्ध नसतील. संपूर्ण देशात ११ आधी सिनेमाचा एकही शो लागणार नाही. स्वत: आमिरनेच हा निर्णय घेतला आहे. लोकांनी एकदम फ्रेश माइंडने सिनेमा पाहायला यावं आणि सिनेमाची मजा घ्यावी असा आमिरचा त्यामागचा उद्देश आहे. तो प्रेक्षकांना यासाठी प्रोत्साहित करत आहे. तसंच सिनेमाचा शेवटचा शो संध्याकाळी ६ चा असेल. सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी लक्षपूर्वक पाहावा असं त्याचं म्हणणं आहे. 

आमिरच्या या निर्णयाची इंडस्ट्रीत चर्चा सुरु आहे. आता या निर्णयाचा त्याला खरोखर फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं आहे. सिनेमात जिनिलिया डिसुजाही मुख्य भूमिकेत आहे. तर आमिर दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडसिनेमा