Join us

बापाला लेकाचं भारी कौतुक, जुनैदच्या 'महाराज' चित्रपटाची आमिरनं दिली सक्सेस पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 18:21 IST

जुनैदचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांना प्रचंड भावला.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  याचा मुलगा जुनैद खान ( Junaid Khan ) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच वादानंतर त्याचा  चित्रपट अखेर २२ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  जुनैद खान आता 'महाराज' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. लेकाचं कौतुक करण्यासाठी आमिर खानने 'महाराज' या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन केलं. 

जुनैदचा या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांना प्रचंड भावला. त्यामुळे जुनैदचे वडील आमिर खान याने आनंदात सक्सेस पार्टी दिली. दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कॅप्शन देत ते म्हणाले, ‘गुड टाइम्स’ म्हणत त्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये रीना दत्ता, जुनैदसह शालिनी पांडे, जयदीप अहलावत आणि इतरही दिसत आहेत. या सक्सेस पार्टीतील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 सिद्धार्थ मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जुनैद खान 'करसन'च्या भूमिकेत दिसला. त्याबरोबरच शालिनी पांडे, शर्वरी वाघ, समीर परांजपे हे कलाकारदेखील झळकले. जुनैद खानच्या अभिनयाबद्दल बोलायचे, तर 'महाराज' हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. पण, त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.  जुनैदने त्यामध्ये कमालीचा अभिनय करीत आपण उत्तम अभिनेता असल्याचे सिद्ध केले होते. आता ‘महाराज’नंतर तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड