भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्यावर लवकरच बायोपिक येणार आहे. परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) या सिनेमात त्यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची तयारीही सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. त्यामुळे तो फाळकेंच्या लूकमध्ये येण्याची तयारी करत असल्याचीही चर्चा झाली. मात्र आता त्याला दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नसून सिनेमा होल्डवर आहे.
बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, राज कुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी आमिर खानला दादासाहेब फाळकेंची स्किप्ट ऐकवली. तेव्हा त्याला वाटलं की सिनेमा थिएटरमध्ये पाहण्यासारखा एलिमेंट स्क्रिप्टमध्ये मिसींग आहे. स्क्रिप्टमध्ये इमोशन, ड्रामा आणि कॉमेडी यांचं मिश्रण असेल अशी आमिरला आशा होती. मात्र यामध्ये त्याला कॉमेडीची कमी वाटली. यामुळेच त्याला काहीसा संशय आला आणि त्याने हिरानींना स्क्रिप्ट रिराईट करायला सांगितलं आहे."
रिपोर्ट्सनुसार, राजू आणि अभिजात आमिर खानच्या रिअॅक्शनवर हैराण झाले होते. सिनेमा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आठवड्यातच ऑन फ्लोर जाणार होता मात्र आता पुढच्या महिन्यात हा फ्लोरवर जाणार आहे. सध्या गोष्टी थांबल्या आहेत आणि आमिरने इतर स्क्रिप्ट्सचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. पूर्ण इंडस्ट्रीतून तो विविध स्क्रिप्ट्स ऐकत आहे."
राजकमार हिरानी आणि अभिजात जोशी हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक जोडी आहे. 'लगे रहो मुन्नाभाई', '३ इ़़डियट्स', 'पीके', 'संजू' असे हिट सिनेमे त्यांनी दिले आहेत.