Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' इतकीच जबरदस्त क्रेझ! ५१ वर्षानंतरही 'या' चित्रपटाचा कोणीही मोडू शकला नाही रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:55 IST

'धुरंधर'लाही टक्कर देतो 'हा' जुना चित्रपट! आतापर्यंत कोणीही मोडू शकलं नाही रेकॉर्ड

Bollywood Cinema: आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'धुरंधर २'(Dhurandhar2) हा चित्रपट १९ मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून छप्परफाड कमाई करत या चित्रपटाने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या स्पाय अॅक्शन चित्रपटात अवघ्या काही दिवसांत मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.सध्या, 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले आहेत आणि थिएटरसमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल सुरू आहेत.

परंतु असा हा पहिलाच चित्रपट नाही, ज्याची प्रेक्षकांमध्ये एवढी क्रेझ पहायला मिळत आहे. याआधीही एका बॉलिवूड चित्रपटासाठी अशाच प्रकारची क्रेझ पाहायला मिळाली होती. जवळपास ५१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तब्बल ५ वर्ष थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचं नाव म्हणजे शोले. रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या चित्रपटाचं नाव हिंदी सिनेसृष्टीतील इतिहासात सुवर्णक्षरांनी कोरलं गेलंय.

सध्या चित्रपट रसिकांमध्ये 'धुरंधर २' साठी जी क्रेझ आहे, तशीच क्रेझ 'शोले' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली होती. जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांचा उल्लेख होतो, IMDb च्या या अहवालावरून 'शोले'चं यश आणि चाहत्यांमधील क्रेझचा सहज अंदाज लावता येतो, ज्यामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की 'शोले' मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये सलग ५ वर्षे चालला.तेव्हा 'शोले'चे नाव आवर्जून घेतलं जातं. 

हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागत असत.अभिनेते धर्मेंद्र, अमजद खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि हेमा मालिनी यांची भूमिका असलेला 'शोले' हा बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.त्रपटातील अविस्मरणीय पात्रं आणि संवादांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाण्यास भाग पाडलं. या चित्रपटातील गब्बरचा 'कितने आदमी थे' हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला.अवघ्या ३ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच पट कमाई करत रेकॉर्ड सेट केला होता. ‘धुरंधर २’मधील हमजा अली मजारी, जमील जमाली, मेजर इक्बाल, एसपी अस्लम यांच्या भूमिकांबद्दल सोशल मीडियावर जशी चर्चा होत आहे, त्याप्रमाणे  शोलेमधील भूमिका लोकप्रिय ठरली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar' craze rivals 'Sholay'; 51-year record remains unbroken!

Web Summary : Like 'Dhurandhar 2', 'Sholay' captivated audiences for five years. The film's iconic characters, dialogues, and success at the Mumbai's Minerva theatre made it a Bollywood legend. 'Sholay's' impact remains unmatched.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा