'लैला मजनू' आणि नुकतंच 'ओ रोमियो' सिनेमात झळकणारा अभिनेता अविनाश तिवारीने नुकतंच लग्नाबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. याशिवाय आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करत लग्नाबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतंच IANS शी संवाद साधताना अविनाशने बदलत्या समाजावर भाष्य केले. तो म्हणाला, "मला असे वाटते की, आजच्या काळात ज्या प्रकारे आपला समाज बदलत आहे, तिथे तुम्हाला कुटुंब हवं असेल करच लग्न करणे गरजेचे आहे."
तो पुढे म्हणाला, "जर तुम्हाला तुमचे कुटुंब वाढवायचे नसेल, तर लग्न करणं तितके महत्त्वाचे नाही. तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत राहू शकता, त्यासाठी लग्नाचा टॅग असणे आवश्यक नाही. जर तुम्हाला कुटुंब हवे असेल, तर मात्र 'वय' हा नेहमीच एक महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणूनच जेव्हा तुमचे शरीर सर्वात चांगल्या स्थितीत असते, त्या योग्य वेळी लग्न केले पाहिजे, असं लोक म्हणतात. पण जर तुम्हाला कुटुंब नको असेल, तर लग्न करण्याची गरज नाही, इतकीच ही साधी गोष्ट आहे."
"माझी वेळ निघून गेली आहे"
अविनाश तिवारीने असेही नमूद केले की, बदलत्या काळानुसार आणि वैद्यकीय प्रगतीमुळे लग्न आणि वय याबद्दल लोकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. तो म्हणाला, "आता लग्नासाठीच्या वयाची मर्यादा वाढली आहे आणि आपल्या देशातही लग्न करणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी झाले आहे. 'गिनी वेड्स सनी २' सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हे महत्वाचे मुद्दे मांडले जात आहेत, जेणेकरून आजकाल लोक लग्न का करू इच्छित नाहीत, हे समजून घेता येईल."
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गमतीने बोलताना अविनाश म्हणाला, "तुम्ही माझ्याबद्दल विचाराल तर, माझ्या आसपासच्या लोकांना वाटते की माझी लग्नाची वेळ आणि वय निघून गेलं आहे, म्हणजेच लग्न करायला खूप उशीर झाला आहे.", अशाप्रकारे अविनाशने आगामी 'गिनी वेड्स सनी २' निमित्त त्याचा लग्नाबद्दल विचार सांगितला आहे.
Web Summary : Actor Avinash Tiwari believes marriage isn't essential if a family isn't desired. He highlights changing societal views, noting marriage is less crucial for companionship. He humorously adds that those around him feel his time for marriage has passed.
Web Summary : अभिनेता अविनाश तिवारी का मानना है कि अगर परिवार की इच्छा नहीं है तो शादी जरूरी नहीं है। उन्होंने बदलते सामाजिक दृष्टिकोणों पर प्रकाश डाला, यह देखते हुए कि विवाह अब साथ रहने के लिए कम महत्वपूर्ण है। उन्होंने मजाकिया अंदाज में कहा कि उनके आसपास के लोगों को लगता है कि उनकी शादी की उम्र निकल चुकी है।