Join us
Daily Top 2Weekly Top 5

-अन् जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या 17 वेळा कानशीलात लगावली; वाचा, 30 वर्षांपूर्वीचा मजेदार किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 20:00 IST

एक सीन पूर्ण करण्यासाठी जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या 17 वेळी कानशीलात लगावली. गंमत वाटली ना? पण हे खरे आहे.

ठळक मुद्दे‘परिंदा’ हा सिनेमा आजच्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 1989 रोजी रिलीज झाला होता.

एक सीन पूर्ण करण्यासाठी जॅकी श्रॉफनेअनिल कपूरच्या 17 वेळी कानशीलात लगावली. गंमत वाटली ना? पण हे खरे आहे. अलीकडे खुद्द जॅकीने याबद्दलचा खुलासा केला. हा चित्रपट होता ‘परिंदा’. विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या क्लासिक सिनेमात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या.1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला आज 30 वर्षे पूर्ण झालीत. काही दिवसांपूर्वी विधु विनोद चोप्रा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत जॅकी, अनिल कपूर या सिनेमावेळच्या आठवणी जाग्या करताना दिसले होते. याचदरम्यान जॅकीने सिनेमातल्या एका दृश्याचा पडद्यामागचा किस्सा सांगितला.

 

त्याने सांगितले की, या सिनेमात एक सीन होता, यात मला अनिलच्या कानाखाली मारायचे होते. खरे तर हा सीन पहिल्याच शॉटमध्ये परफेक्ट शूट झाला होता. पण अनिलला आणखी एक शॉट घ्यावासा वाटला आणि पुढे परफेक्ट शॉटच्या नादात मी खरोखरच अनिलच्या 17 वेळा कानशीलात लगावल्या. कारण हवेत मारलेला फटक्याच्या आधारे अनिलच्या चेह-यावर रिअल एक्सपे्रशन उमटत नव्हते.  ‘परिंदा’ हा सिनेमा आजच्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 1989 रोजी रिलीज झाला होता. क्राईम ड्रामा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता.  

टॅग्स :जॅकी श्रॉफअनिल कपूर