Join us

आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 10:04 IST

Aamir Khan : अभिनेता आमिर खानच्या घरी सुमारे २५ आयपीएस अधिकारी पोहोचले होते. त्याच्या घराच्या बाहेरुन अनेक गाड्या आणि बस बाहेर पडताना दिसल्या. इतके सरकारी अधिकारी त्याच्या घरी का पोहोचले हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. पण या मागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) शेवटचा 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par) या चित्रपटात दिसला होता. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घराचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या गाड्या त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. असे सांगितले जात आहे की, सुमारे २५ आयपीएस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले होते. आता आयपीएस अधिकाऱ्यांची एक टीम आमिरच्या घरी का आली याची सर्वत्र चर्चा आहे. 

रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, सुमारे २५ आयपीएस अधिकारी आमिर खानला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील घरी पोहोचले होते. मात्र रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की, ही टीम अभिनेत्याला भेटण्यासाठी गेली होती, परंतु आमिर किंवा त्याच्या टीमने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. न्यूज१८ ने आमिरच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्या अचानक येण्यामागील कारण त्यांना समजले नाही. त्यांनी सांगितले की, 'आम्ही अजूनही आमिरशी बोलत आहोत.'

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाएवढे आयपीएस अधिकारी आमिर खानच्या घरी एकत्र का पोहोचले, हे अद्याप समजू शकलेलं नाही, पण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरनं विचारलं, 'रेड पडली आहे का?', दुसऱ्याने म्हटलं, 'हे सर्व स्टार जमीन पाहण्यासाठी आले आहेत.', तिसऱ्याने लिहिलं, 'काय झालं?..'

'सितारे जमीन पर' कलेक्शन'सितारे जमीन पर' चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, आमिरच्या 'सितारे जमीन पर'ने रिलीजच्या एका महिन्यातच भारतात सुमारे १६५ कोटी रुपये कमावले. आर.एस. प्रसन्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यात जिनिलिया डिसूझाही पाहायला मिळाली.

वर्कफ्रंटमीडिया रिपोर्ट्सनुसार तो राजकुमार हिराणी बनवत असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये दिसणार आहे.

टॅग्स :आमिर खान