Join us

अखेर त्यांची भेट झालीच! 'दिल पे चलाई छुरियाँ' गाणाऱ्या राजूला भेटत सोनू निगमने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:38 IST

दगडांच्या तालावर गाणं गायलं अन्...; 'दिल पे चलाई छुरियॉं' गाणाऱ्या राजू कलाकारची सोनू निगमने घेतली भेट; केली मोठी घोषणा 

Sonu Nigam: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. हल्ली समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या किंवा सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या गाण्यावर सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीही रिल्स व्हिडीओ बनवत असतात. सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हे चर्चेत असणारं गाणं म्हणजे 'दिल पे चलाईं छुरियॉं' आहे. या गाण्यामुळे राजू भट्ट उर्फ राजू कलाकार चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. नुकतीच सोनू निगमने (Sonu Nigam) राजू कलाकारची भेट घेऊन त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सनम बेवफा या चित्रपटातील हे गाणं आहे. हे गाणं सोन निगमने गायलं होतं. इंटरनेटवर व्हायरल सेन्सेशन बनलेल्या राजू कलाकरने दगडाचे दोन तुटलेले तुकडे वाजवून 'दिल पे चलये चुरियां' हे गाणे गायलं. बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर नवा ट्रेंड सेट झाला. दरम्यान, सोनू निगमने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर राजू कलाकालसोबतचा व्हिडीओ शेअर करत दोघेही दिल पे चलाई छुरियॉं गाणे एकत्र गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ टी-सीरीजच्या भागीदारीत बनवण्यात आला आहे. शिवाय या व्हिडीओच्या माध्यमातून लवकरच या गाण्याचं नवं व्हर्जन  प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी हिंट सोनू निगमने दिली आहे. 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सोनू निगम आणि राजू कलाकार गाणं गाण्यात दंग झाले आहेत. यापूर्वी कधीही असं ऐकलेलं नसेल असं ऐकण्यासाठी सज्ज व्हा, येत्या सोमवारी काहीतरी खास होणार आहे! ...",  असं खास कॅप्शन सोनू निगमने या व्हिडीओला दिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. गायकाच्या या व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत राजू कलाकारचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने खास कमेंट करत लिहिलंय, "राजू भाईला लॉटरी लागली...", तर आणखी एका यूजरने "खूप लकी आहेस तू यार...", अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :सोनू निगमबॉलिवूडसोशल व्हायरलसोशल मीडिया